हरारे ; भारतीय क्रिकेट संघाने झिम्बॉब्वे विरोधीतल तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना जिंकलाय. भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल याने करिअरमधील पहिलं शतक झळकावलं. त्या जोरावर भारताने प्रतिस्पर्धी संघासमोर 289 धावांचं आव्हान उभं केलं होतं. झिम्बॉब्वेकडूनही सिकंदर रजाने शानदार शतक झळकावत आपल्या देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र गिलने रजाचा कॅच घेत त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. भारताने 50 षटकांत 8 बाद 289 धावा केल्या. तर झिम्बॉब्वेने 49.3 षटकांत 10 विकेट गमावून 276 धावांपर्यंत मजल मारली.
हरारे येथे भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिसरा एकदिवसीय सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज शुबमन गिलने जोरदार फटकेबाजी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले पहिलवहिले शतक केले आहे. शुबमनने ९७ चेंडूत १३० धावांची खेळी केली. आजच्या सामन्यात शुबमन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.
भारताच्या २८९ धावांना प्रत्युत्तर देताना झिम्बाब्वेचा डाव ४९.३ षटकात २७६ धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून शुभमन गिलने १३० धावांची उत्कृष्ट खेळी करत पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याचवेळी झिम्बाब्वेसाठी सिकंदर रझा याने ११५ धावा करत शतक झळकावले. भारताकडून आवेश खानने तीन बळी घेतले. भारताचा हा विजय येणार्या आशिया कपसाठी मनोबल वाढवणारा ठरला आहे.
शार्दुल ठाकूरने मिळवून दिली मोलाची विकेट
शार्दुल ठाकूरने यावेळी भारताला मोलाची विकेट मिळवून दिली. शार्दुलने सिकंदरला वेगवान गोलंदाजीच्या जाळ्यात ओढले आणि त्याला मोठा फटका मारण्यास भाग पाडले. सिकंदरला बाद करत त्याने संघाला मोठे यश मिळवून दिले.
भारतीय खेळाडू ‘काला चश्मा’ वर थिरकले
झिम्बाब्वे विरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. शिखर धवनने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडू ‘काला चश्मा’ गाण्यावर डान्स करत आहेत. धवननेही काळा चश्मा लावला आहे. यासोबतच केएल राहुल, ईशान किशन, शुभमन गिल, कुलदीप यादव, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद, राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाडही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. ईशान किशनच्या डान्स मुव्हसने हा व्हिडिओ अधिक मनोरंजक झाला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवन आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. केएल राहुल ३० धावा करून बाद झाल्यानंतर शुबमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने सुरुवातीपासूनच झटपट धावा केल्या. ८२ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक पूर्ण केले. शुबमन गिल आणि ईशान किशन जोडीने तिसऱ्या गड्यासाठी १२७ चेंडूत १४० धावांची भागीदारी केली.
दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शुबमन गिलला ‘न्यूझीलंड अ’विरुद्ध होणाऱ्या मालिकेत ‘भारत अ’ संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. न्यूझीलंड अ संघ सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. सध्या शुबमन गिल अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ६४, ४३ आणि नाबाद ९८ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने नाबाद ८२ धावांची खेळी केली तर दुसऱ्या सामन्यात ३३ धावा केल्या होत्या.