बृहन्मुंबई, २८ सप्टेंबर २०२२: विजयभूमी युनिव्हर्सिटी या भारताच्या पहिल्या लिबरल प्रोफेशनल युनिव्हर्सिटीकडून २८ सप्टेंबर २०२२ रोजी विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचचा आणि २०१९च्या वर्गाचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, २०२० पद्मभूषण पुरस्कारप्राप्त प्रा. जगदीश शेठ म्हणाले की, “विजयभूमीची पहिली बॅच भारतातील लिबरल व्यावसायिक शिक्षणाचे केंद्र ठरेल. युनिव्हर्सिटीचा “एनईपी सँडबॉक्स” या नावाने गौरव करताना ते म्हणाले की, आंतरशाखीय अभ्यासक्रमांमध्ये काम करण्याची ही संधी खूप अमूल्य आहे.”
आयआयटी कानपूरचे माजी संचालक २०१३ पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि सन्माननीय अतिथी डॉ. संजय धांडे म्हणाले की, “विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये देण्यात येणा-या सर्वांगीण शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये मानवी आणि व्यावसायिक मूल्ये रूजवण्यासाठी एक नवीन दृष्टीकोन अंगीकारण्यात येतो”.
विजयभूमीचे प्र-कुलगुरू प्रा. ए. परशुरामन आणि स्कूल ऑफ बिझनेस, युनिव्हर्सिटी ऑफ मायामीमध्ये वेल्स डब्ल्यू. मॅकलमोर चेअर इन मार्केटिंग (बर्गर किंग कॉर्पोरेशनकडून प्रायोजित)चे धारक प्रा. एमेरिटस यांनी अत्यंत आगळ्यावेगळ्या पदवीचे मार्ग आखण्यासाठी या पदवीधरांचे अभिनंदन केले.
इंडियन बिझनेस एज्युकेशनच्या जागतिकीकरणाचे पुरस्कर्ते प्र-कुलगुरू डॉ. आतिश चट्टोपाध्याय यांनी युनिव्हर्सिटी रिपोर्ट सादर केला आणि नमूद केले की, विजयभूमीमधील सराव अभ्यासक्रमांची रचना या टप्प्यावर अतुलनीय आहे आणि पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम कॉर्पोरेट कनेक्ट त्यातून मिळाला आहे. ते पुढे म्हणाले की, हा आमच्यासाठी ऐतिहासिक आणि भावनिक क्षण आहे, कारण आज पदवीधर झालेली लिबरल एज्युकेशन नेटवर्कच्या आधारे असलेली ही पहिली एनईपी पूर्तता करणारी बॅच आहे. मी संपूर्ण विद्यापीठाच्या वतीने २०१९च्या वर्गाला आज पदवीधर होण्यासाठी अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्यासाठी यशाच्या शुभेच्छा देतो. अभ्यासक्रमाच्या कालावधीत विद्यापीठाने विविध पावले उचलून विद्यार्थ्यांना टी-शेप्ड व्यावसायिक होण्यासाठी एक चांगला अभ्यासक्रम तयार केला आहे. पहिल्या बॅचमधील विद्यार्थी हे विद्यापीठाचे पहिले माजी विद्यार्थी असतील आणि ते कायम खास असतील.”
विजयभूमी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष श्री. संजय पदोडे हे या पदवीदान समारंभाचे अध्यक्ष होते. ते म्हणाले “पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा एक असा क्षण असतो जेव्हा विद्यापीठ आपल्या पदवीधरांना समाजासमोर आणते. पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासासाठी केलेल्या प्रयत्नांचे तसेच कामगिरीचे कौतुक त्यातून केले जाते आणि त्यांना भविष्यासाठी आशा ठेवण्याच्या दिशेने प्रेरित करते. सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमुळे मागील काही वर्षे सर्वांसाठी कठीण ठरली आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांना शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पूर्णपणे नवीन माध्यमाचा अंगीकार करावा लागला आहे. आज आम्ही एकमेकांच्या सहकार्याने, मदत करून आणि एकमेकांना सुरक्षित ठेवून मागील काही वर्षांचा तसेच कोविड-१९ मुळे समोर आलेल्या प्रचंड अडचणींचा आढावा घेत आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा वेगवेगळ्या आहेत आणि शिक्षण ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. मी तुम्हाला सर्वांना तुमच्या आशाआणि ध्येयांशी जोडले राहण्याचे आवाहन करतो.”
युनिव्हर्सिटीशी संलग्न संस्थांमधील पदवीधरांच्या पहिल्या बॅच जसे, जगदीश शेठ स्कूल ऑफ मॅनेजमेंट (जेएजीएसओएम), ट्रू स्कूल ऑफ म्युझिक आणि इनसोफे स्कूल ऑफ डेटा सायन्स याभारताचे पहिले एनईपी पूर्तता करणारे पदवीधर आणि पदव्युत्तर बॅचआहेत, ज्यांनी लिबर एज्युकेशन आराखडा स्वीकारला आहे. या पदवीदान समारंभात २२ पदवी विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या.
विजयभूमी युनिव्हर्सिटी सुसंगत आणि दर्जेदार शिक्षण देऊन आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, डेटा सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, सायन्स आणि टेक्नॉलॉजी, बिझनेस, लॉ, डिझाइन, म्युझिक आणि लिबरल आर्ट्स या विषयांमध्ये उच्च दर्जाचे संशोधन देते. रायगडमधील कर्जत येथे स्थित ही युनिव्हर्सिटी सर्वसमावेशक, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि सातत्यपूर्ण पद्धतीने रोजगारक्षम व्यावसायिकांना नेमण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यामुळे जगात एक सकारात्मक बदल घडवला जाऊ शकेल.