मुंबई, – लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरी सेवांमधील जगातील अग्रगण्य कंपनी फेडएक्सला अक्षय पात्र फाऊंडेशनसोबत आपला सहयोग चालू ठेवताना अतिशय अभिमान वाटत आहे. अक्षय पात्र फाऊंडेशन भारतातील शालेय मुलांना पौष्टिक आहार देण्यासाठी समर्पित असलेल्या पीएम पोषण कार्यक्रमाचा एक सक्रीय भागीदार आहे. याच्या सहयोगात फेडएक्स सामाजिक जबाबदारी आणि निरंतर विकासासाठी आपल्या बांधिलकीची पुष्टी करते आणि समाज आणि पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचे उद्दिष्ट ठेवते.
फेडएक्सने पनवेल, दिल्ली आणि नरसिंगी येथील अक्षय पात्र फाऊंडेशनला सात इलेक्ट्रिक वाहने दान केली आहेत. इंधन-आधारित वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमधील रुपांतरणामुळे जेवण वितरीत करण्याची प्रक्रिया जलद होईल. ज्यामुळे फाऊंडेशनला त्याच वेळी मुलांना आहार देण्याच्या आणि त्यांना सशक्त बनवण्याच्या त्याच्या मुख्य ध्येयासाठी अधिक सामग्रीचे वाटप करता येतील व कार्बन फूटप्रिंट कमी होईल. याव्यतिरिक्त, फेडएक्सने 5,50,000 मुलांसाठी मध्यान्ह भोजनाचे समर्थन केले.
फेडएक्स आणि अक्षय पत्र फाऊंडेशन यांनी एकत्रितपणे मध्यान्ह भोजनाचे वितरण आणि प्रशासकीय कामांसाठी, खास करून मध्यान्ह भोजन कार्यक्रमाशी संबंधित कामांसाठी इलेक्ट्रिक वाहने (ईव्हीज) प्रस्तुत केली आहेत. 2022 मध्ये, फेडएक्सने अक्षय पत्र फाऊंडेशनसोबत पनवेलमध्ये सौर पॅनेलची स्थापना केली, बेळ्ळारीमध्ये इलेक्ट्रिक बाईकचे वितरण केले, आणि संपूर्ण दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूमधील 137,602 शालेय मुलांना माध्यान्ह भोजनाची तरतूद करत अनेक शाश्वत प्रकल्पांसाठी सहकार्य केले.
मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिका, इंडिया ऑपरेशन्स आणि कस्टमर एक्सपिरिअन्सचे उपाध्यक्ष श्री. सुवेन्दू चौधरी यांनी व्यक्त केले, “फेडएक्समध्ये, निरंतरतेसाठी आमची बांधिलकी आमच्या स्वतःच्या कार्याहून महत्त्वाची आहे. जगभरातील व्यवसाय आणि समुदायांना शाश्वत पद्धती अंगीकृत करण्यासाठी प्रेरणा देणे आमचे ध्येय आहे, ज्यामुळे एक सकारात्मकता निर्माण होईल. अक्षय पात्र फाऊंडेशनसोबतचे आमचे सहकार्य ईव्हीज आणि सौर पॅनेल यांच्यासारखे उपाय त्यांच्या दैनंदिन जीवनात आणून, पर्यावरणासाठी लाभ आणि लाखो मुलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतात व या निरंतर सहयोगाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देतात.”
अक्षय पात्र फाऊंडेशनचे सीईओ श्रीधर वेंकट यांनी फेडएक्सच्या चालू असलेल्या भागीदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या सहकार्याच्या परिणामाबद्दल आपले विचार व्यक्त केले: “भारताच्या भविष्याचे पोषण करण्याच्या आमच्या ध्येयामध्ये फेडएक्स देत असलेल्या सतत पाठिंब्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. त्यांची निरंतरता आणि समाजाच्या कल्याणासाठी असलेली बांधिलकी आणि आमची उद्दिष्ट्ये समान आहेत आणि एकत्रितपणे, आम्ही फेडएक्सच्या सहाय्याने देशभरातील मुलांच्या जीवनात ठोस बदल घडवून आणत आहोत. आम्ही केवळ जेवणच देत नाही, तर सकारात्मक बदल घडवून आणत आहोत आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य घडवत आहोत.”
फेडएक्स आणि अक्षय पत्र फाऊंडेशन आपल्या एकत्रित प्रयत्नांद्वारे, अपात्र समुदायातील मुलांना पौष्टिक जेवण, शैक्षणिक संधी आणि आशादायक भविष्य उपलब्ध करून देतात. दोन्ही संस्था आपल्या भविष्याकडे पाहताना समाजाची सेवा, बांधिलकी वाढवण्याच्या आणि समाजावर कायमस्वरूपी प्रभाव पाडण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत.