- प्राईस बँड प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी ३०० ते ३१५ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
- बोली बुधवार, ८ मे २०२४ रोजी सुरु होईल आणि शुक्रवार, १० मे २०२४ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांना मंगळवार, ७ मे २०२४ रोजी बोली लावता येईल.
- कमीत कमी ४७ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास ४७ च्या पटीत बोली लावता येईल.
- आरएचपी लिंक:
New Delhi/NHI NEWS AGENCY : आधार हौसिंग फायनान्स लिमिटेडने (कंपनी) आपला आयपीओ बुधवार, ८ मे २०२४ रोजी खुला करण्याचे ठरवले आहे.
आयपीओमध्ये १०,००० मिलियन रुपयांचे इक्विटी समभाग नव्याने जारी करण्यात आले आहेत (फ्रेश इश्यू) आणि बीसीपी टॉपको VII पीटीई लिमिटेड (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर) २०,००० मिलियन रुपयांपर्यंतचे इक्विटी समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करत आहे (विक्रीसाठी ऑफर)
नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून जे भांडवल उभे राहील त्याचा वापर ऑनवर्ड लेन्डिंगसाठी भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी करण्याचे ठरवले आहे.
रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, कर्नाटक यांचेकडे बंगलोर येथे दाखल करण्यात आलेल्या, दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत इक्विटी समभाग प्रस्तुत करण्यात येत आहेत. आरएचपीमार्फत जारी करण्यात आलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर सूचिबद्ध करण्यात येणार आहेत. या ऑफरसाठी एनएसई हे डेसिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज आहे.
ब्लॅकस्टोनचे प्रायव्हेट इक्विटी विभागाचे आशिया खंडाचे प्रमुख श्री अमित दीक्षित यांनी सांगितले, “हे लिस्टिंग आधार हौसिंग फायनान्स लिमिटेडसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताच्या निर्माणात योगदान देणारे व्यवसाय उभारणीचे काम अतिशय सर्वोत्तम पद्धतीने आम्ही करतो त्याचे उदाहरण म्हणजे हे परिवर्तन आहे. व्यवसाय वृद्धीसाठी आम्ही आमची व्याप्ती, नेटवर्क आणि सर्वोत्तम जागतिक प्रथांचा वापर केला आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटाईज करण्यासाठी कंपनीला सक्षम बनवले. ही भागीदारी अतिशय उत्तम असून आज आमचा व्यवसाय ज्याठिकाणी आहे त्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो.”
ब्लॅकस्टोनचे प्रायव्हेट इक्विटीचे सिनियर मॅनेजिंग डायरेक्टर श्री मुकेश मेहता यांनी सांगितले, “वंचित भारतीयांना स्वतःच्या मालकीचे घर मिळवण्यासाठी आणि कंपनीच्या परिवर्तन व वृद्धीमध्ये भूमिका निभावण्यासाठी सक्षम करण्याच्या आधार हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या मिशनचा एक भाग बनणे नक्कीच महत्त्वाचे आहे. कंपनीच्या नेतृत्वाच्या पावलांशी पाऊल जुळवून आणि ब्लॅकस्टोनची भांडवल, संसाधने व तंत्रज्ञान नैपुण्यांपर्यंतची पोहोच वापरून उभारणी करणे ही आमची प्राथमिकता आहे.”
आधार हौसिंग फायनान्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री ऋषी आनंद यांनी सांगितले, “व्यक्ती आणि कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या घराची मालकी मिळवून देऊन सक्षम बनवण्याच्या प्रवासात हा लक्षणीय टप्पा आहे. ‘घर बनेगा, तो देश बनेगा’ या उक्तीनुसार आम्ही राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी स्वीकारली असून अधिक मजबूत समुदाय निर्माण करण्यासाठी पायाभरणी करत आहोत.”
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, नोमुरा फायनान्शियल अड्वायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे आहेत.
या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलेल्या ज्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांची व्याख्या दिली गेलेली नाही त्यांचा अर्थ आरएचपीमध्ये देण्यात आल्याप्रमाणे आहे.
ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19 (2) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम 31 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम 6(1) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी 50% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठी लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी 60% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.
नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. नेट ऑफरचा कमीत कमी 15% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार, प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग 2,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि 1०,००,००० रुपयांपर्यंत ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल. नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग 1०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी 35% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे.