मुंबई – आज एअर बीएनबीने आयकॉन्स नावाची योजना जाहीर केली आहे. यात संगीत, चित्रपट, टेलिव्हिजन, कला, क्रीडा आणि यासारख्या अनेक क्षेत्रातील लोकांच्या घरात रहायला मिळणार आहे. हे आयकॉन्स तुम्ही आतापर्यंत फक्त कल्पना केली असेल अशा त्यांच्या विश्वात तुम्हाला घेऊन जाणार आहेत. आता तुम्ही फेरारी म्युझियम मध्ये झोपू शकता, एखाद्या राजकुमाराच्या पर्पल रेन हाऊसमध्ये राहू शकता, आणि बॉलिवूड आयकॉन जान्हवी कपूरच्या समुद्रकिनारी वसलेल्या घरात एक दिवस व्यतित करू शकता. एअरबीएनबीवर आज आम्ही असे पहिले ११ आयकॉन आणणार आहोत. त्यामुळे या वर्षांत जगभर असे अनेक अनुभव तुम्हाला घेता येतील.
एअरबीएनबी इंडिया, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग, तैवान चे व्यवस्थापक अमनप्रीत बजाज म्हणाले, “आयकॉन्स असे जादुई आणि कल्पनातीत असणारे अनुभव देतात. आयकॉन्सच्या लाँचचा एक भाग म्हणून जान्हवी कपूर बरोबर या कॅम्पेनसाठी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या कॅम्पेनमुळे जान्हवीच्या समुद्र किनाऱ्यावरील घराची झलक बघायला मिळेल.”
लाँचचा भाग म्हणून बॉलिवूड सुपरस्टार जान्हवी कपूर तिच्या चेन्नईच्या घराचे दरवाजे खुले करणार आहे. ही तिची कौटुंबिक मालमत्ता आहे असून हा अभूतपूर्व अनुभव असेल. पडद्यावर अतिशय कसदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या जान्हवीचं घर या प्रमोशनल कॅम्पेन अंतर्गत दोन पाहुण्यांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
जान्हवीच्या घराबद्दल अधिक माहिती
समुद्राच्या अगदी समोर वसलेलं जान्हवीचं हे घर म्हणजे उबदारपणाचा आणि शांततेचा परिपाक आहे. ती लहान असताना उन्हाळाच्या सुट्टीत अनेकदा तिच्या कुटुंबाबरोबर या घरात यायची आणि आता पहिल्यांदाच ते एअरबीएनबीच्या गेस्टसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे इथे येणारे पाहुण्यांना कपूर घराण्याच्या परंपरेची आणखी जवळून ओळख होईल आणि एखाद्या बॉलिवूड स्टार सारखा ते या जागेचा आनंद घेऊ शकतील.
जान्हवी सर्व पाहुण्यांचे स्वागत करणार असून ती पाहुण्यांना घर दाखवेल. घराच्या प्रवेशद्वारावर हाताने तयार केलेलं संगमरवरी शिल्प आहे. त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचा आणि शुभशकुनाचा भास होतो. याबरोबरच आतल्या घराच्या भागात बांबू, वेत आणि संगमरवराने सजावट केली आहे. संपूर्ण घर अगदी रिलॅक्स होण्यासाठीच तयार केलं आहे. घराच्या हृदयस्थानी एक लिव्हिंग रुम आहे. तिथे अगदी नेमक्या वस्तू मांडल्या आहे. डायनिंग एरियामध्ये कुटुंबाच्या काही आठवणी जतन करून ठेवल्या आहेत. जान्हवीची ड्रेसिंग रुमही पहायला मिळेल. तिथे ती नैसर्गिक त्वचेसाठी ट्रीटमेंट घेते. घराला हवेशीर मास्टर बेडरुम आहे. घराच्या मागच्या बाजूला एक मोठी बाग आहे. तिथे पाम ची झाडं आणि कारंजे आहेत. एक महागडा स्विमिंग पूल आहे. एकूणच हा एक हवेशीर सेटअप आहे आणि रिलॅक्स होण्यासाठी तसंच मोकळ्या हवेत सूर्यास्त पाहण्यासाठी एक सुंदर जागा आहे.
“चेन्नईच्या घरात माझ्या कुटुंबाबरोबर घालवलेले क्षण ही माझ्यासाठी उन्हाळ्याची एक रम्य आठवण आहे. ही जागा मला कायमच एखाद्या अभयारण्यासारखी वाटत आली आहे. हे सगळं मला माझ्या फॅन्सबरोबर शेअर करायचं आहे म्हणून मी माझ्या घराचे दरवाजे एअरबीएनबीच्या माध्यमातून उघडले आहेत. आमच्या कुटुंबाच्या काही पारंपरिक गोष्टी एअरबीएनबीच्या पाहुण्यांबरोबर शेअर करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. त्यामुळे पाहुण्यांना कपूर घराण्यासारखा या जागेचा आनंद घेता येईल. पूलजवळ बसून चिल करणे, योगा, माझ्या आईच्या नॅचरल स्कीन केअर रेसिपी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन आठवणी तयार करणे हे सगळं इथे येणारे गेस्ट करू शकतील. एअरबीएनबीच्या आयकॉन प्रवर्गात माझा समावेश केल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे आणि इथे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यास मी आतूर आहे.” असं जान्हवी कपूर म्हणाली.
इथे राहण्याविषयी: बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर सारखं रहा
या घरात आल्यावर चाहत्यांना जान्हवी कपूरला भेटण्याची संधी मिळेलच पण ती जसा दिवस व्यतित करते ते बघायला मिळेल आणि ती ज्या गोष्टी एन्जॉय करते त्याही करायला मिळतील. इथल्या स्टे मध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल.
– जान्हवी बरोबर एक खासगी टूरचा समावेश असेल, ज्यात ती तिच्या या घरातील आठवणी सांगेल.
– जान्हवी तिच्या त्वचेची काळजी कशी घेते याबद्दल सगळी माहिती ती देईल आणि तिच्या सौंदर्याचं रहस्य उलगडेल.
– जान्हवीच्या आवडत्या दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल. त्यात घी पोडी राईस, आंध्रा बिर्यानी, पेसरट्टू डोसा आणि पल्कोवा यांचा समावेश आहे.
– मनमोहक दृश्यांबरोबरच सकाळी योगसाधना आणि त्यानंतर अतिशय सुंदर नाश्ता
– या एकमेवाद्वितीय अनुभवांची आठवण म्हणून जान्हवीकडून पर्सन्लाईज्ड भेटवस्तू
बुकिंग कसं कराल?
– बुकिंग १२ मे ला सकाळी ६.३० वाजता सुरू होईल. पण ९ मे पासूनच काऊंटडाऊन सुरू होईल.
– दोन गेस्ट च्या दोन गटांना इथला स्टे अगदी शून्य रुपयात बूक करण्याची नामी संधी असेल
– चेन्नईला येण्याजाण्याचा खर्च पाहुण्यांना करावा लागेल.
ग्रॅमी विजेता दोजा कॅट, टिकटॉक स्टार खॅबी लेम आणि रेगॅटॉन कलाकार फिड यांनीही आपलं घर अशाच पद्धतीने खुलं केलं आहे.
जान्हवी कपूर सारख्या आयकॉन्सची एक वेगळी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे एअरबीएनबी होमपेजवर शोधण्यासाठी सोपं जाईल. प्रत्येक आयकॉन लाईव्ह जाण्याआधी काऊंटडाऊनची वेळ दाखवली जाईल आणि गेस्ट अप वरून बुकिंग करू शकतात. निवड झालेल्या नशीबवान पाहुण्यांना हा अनुभव घेण्यासाठी डिजिटल गोल्डन तिकीट मिळेल.
विशेष सूचना- हे फक्त मार्केटिंग कॅम्पेन असून हे घर लॉजिंग- बोर्डिंग, किंवा सुट्ट्यांसाठी लिस्टेड़ नाही याची नोंद घ्यावी.