खऱ्या प्रेमकथेत क्रांतिकारी यकृत प्रत्यारोपण उपक्रमामुळे भरतोय आनंद : अर्ली रिकव्हरी प्रोग्राम देशभरातील रुग्णांसाठी ठरतोय आशेचा किरण
मुंबई, NHI NEWS AGANCY
साऊथ एशियन लिव्हर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटल्सला आपल्या प्रयत्नात उल्लेखनीय यश मिळाले असून मुंबईतील पहिल्या वहिल्या अर्ली रिकव्हरी प्रोग्रामची घोषणा करताना आनंद होत असल्याचे वोकहार्ट हॉस्पिटल्सने म्हटले आहे. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हटले की, सर्वसामान्य व्यक्तीवर त्याच्या अवाढव्य खर्चाचा ताण आल्याशिवाय राहत नाही. परंतु, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबतचा अर्ली रिकव्हरी प्रोग्राम जगभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार असून वैद्यकीय नवकल्पनेतही हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे. शिवाय, ही शस्त्रक्रिया पती – पत्नीचा एकमेकांना असलेल्या आधार, पाठिंब्याचा प्रभाव दाखवून देते. तसेच प्रेमासाठी केलेली कृती जीव वाचवण्यासाठी सर्व प्रकारच्या सीमा ओलांडते हेही यातून दिसून येते.
वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील प्रत्यारोपण उपक्रमाचे संचालक डॉ. टॉम चेरियन यांना वैयक्तिकरीत्या तब्बल 700 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याचा अनुभव असून त्यातील 400 शस्त्रक्रिया त्यांनी लंडन येथे केल्या आहेत. भारतात प्रत्यारोपण उपक्रमाशी जोडले जाण्याआधी त्यांनी लंडन येथील किंग्ज कॉलेज हॉस्पिटल आणि बरमिंगहम येथील क्विन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये 15 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले आहे.
उपक्रमाची तपशीलवार माहिती देताना डॉ. टॉम चेरियन म्हणाले की, “यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला सातव्या दिवशी घरी पाठवणे आणि यकृत दात्याला सहाव्या दिवशी घरी पाठवणे सोपी गोष्ट नाही. अशा प्रकारे यश प्राप्त करण्यासाठी काळजीपूर्वक आणि सूक्ष्मातील सूक्ष्म बाबींचे नियोजन आवश्यक आहे. अशा प्रकारची नवकल्पना वैद्यकीय सेवेतील उच्च गुणवत्तेचे निदर्शक असून शस्त्रक्रियेशी संबंधित सर्व बाबी उत्कृष्टपणे हाताळणे, काळजी घेणे आणि तयारी शिवाय अशा प्रकारे रुग्णांना ताबडतोब घरी पाठवणे शक्य नाही.”
वैद्यकीय क्षेत्रातील नेहमीच्या पद्धतीपेक्षा रुग्ण बरे होऊन लवकर घरी पाठवण्याच्या असामान्य गतीबद्दल वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील केंद्र प्रमुख डॉ. वीरेंद्र चौहान म्हणाले की, “आरोग्यविषयक सेवेतील आघाडीची संस्था म्हणून रुग्णांच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मुंबईचा पहिला वहिला अर्ली रिकव्हरी प्रोग्राम सुरु करताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशी संबंधित हा मैलाचा दगड केवळ नवकल्पनेबाबतची आमची वचनबध्दता दाखवत नाही तर उच्च दर्जाची सेवा पुरवण्यातील आमचा समर्पणभावही दाखवतो. हा महत्त्वाचा उपक्रम सुरू करून आम्ही आमच्या शहरातील रुग्ण बरे होण्यासाठी क्रांती घडवत असून वैद्यकीय उपचारांमध्ये नवीन मानकांची उभारणी करत आहोत.”
यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशी संबंधित हे यश मिळवण्यासाठी अनेक तांत्रिक बाबींचा हातभार लागला आहे. प्रा. डॉ. टॉम चेरियन यांनी स्पष्ट केले की, “सर्वप्रथम, प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया केल्याने त्यादरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असून यामुळे रुग्णाला नव्याने रक्त देण्याची गरजही राहिलेली नाही. दुसरे म्हणजे शस्त्रक्रियेआधी केल्या जाणाऱ्या स्पायरोमेट्रीसारख्या तपासणीमुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर बरा होणे शक्य झाले आहे. तिसरे म्हणजे, नवीन लिव्हर ग्राफ्टसाठी अत्याधुनिक ड्रेनेज प्रणालीचा वापर केल्याने सुरुवातीपासूनच हवी ती कार्यक्षमता सुनिश्चित करते. शेवटी, गंभीर परिस्थितीमध्ये विशेषतः आयसीयुमधील रुग्णावर उपचार करताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने रुग्ण बरे होणे आणि एका आठवड्यात घरी पाठवणे शक्य झाले आहे.”
यकृतदात्या श्रीमती टिना टाकू आणि यकृत प्रत्यारोपण केले गेलेले रुग्ण श्री. अंचू रिमो आयुष्यात मिळालेल्या या दुसऱ्या संधीबाबत कृतज्ञता व्यक्त करताना भारावून गेले. तसेच त्यांनी प्रा. डॉ. टॉम चेरियन यांना त्यांच्या अनमोल सहकार्य व पाठिंब्याबाबत मनापासून धन्यवाद दिले. याबाबत श्रीमती टिना टाकू म्हणाल्या की, ” माझ्या मनातली कृतज्ञतेची भावना मांडण्यासाठी शब्दही कमी पडतील. आयुष्यात मिळालेल्या या भेटवस्तूने आम्हाला स्पर्श केला असून त्याचा आनंद मोजता येऊ शकणार नाही. आम्ही डॉ. टॉम चेरीयन आणि त्यांच्या पथकाच्या समर्पण आणि कौशल्याबद्दल सदैव ऋणी राहू ”
सुरुवातीच्या यकृतदात्याने कौटुंबिक दबावनंतर यकृत दानासाठी नकार दिला. अशा परिस्थितीत टिना टाकू यांनी यकृत दान देण्यासाठी पुढे येण्याचा निर्णय घेतला. यातूनच टिना टाकू यांच्या विलक्षण धैर्य आणि वचनबद्धतेची ओळख होते. चार मुलांची आई असूनही टिना टाकू यांनी यकृत दानाची जबाबदारी स्वीकारली आणि संकटांना तोंड देत अढळ विश्वास व दृढनिश्चय दाखवला.
वोकहार्ट हॉस्पिटलचा यकृत प्रत्यारोपणविषयक उपक्रम सुरुवातीच्या टप्प्यात असूनही रुग्णसेवेचे वचन प्रारंभीच दिसून आले आहे. वोकहार्ट हॉस्पिटल्स आणि त्यांचे वैद्यकीय पथक पूर्वोत्तर भारतासारख्या भागात रुग्णसेवेसाठी पोहोचण्याच्या प्रयत्नांचा विस्तार करण्यासाठी उत्सुक आहे.
[10:31 PM, 5/2/2024] Bhushan Mulaye Pro: Photo nestly cha batmila lagla aahe