आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात प्रत्येकाला चालू घडामोडीबाबत अपडेट राहणे अत्यावश्यक झाले आहे, नव्हे राहिलेच पाहिजे. आम्ही newshindindia.com या वेबसाईटचा मालक-संपादक म्हणून आमच्या वाचकांच्या अपेक्षा आमच्या परिने पुर्ण करण्याचा मानस आहे. गेली 25 वर्ष मुंबईतील नामवंत अशा मराठी दैनिकामध्ये संपादकीय विभागातील येणाऱ्या बातम्यांच्या कंपोझिंग पासून ते बातम्यांना न्याय देत वाचकांपर्यंत कशा गेल्या पाहिजेत याचे मार्गदर्शन मिळत राहिले. आम्ही पत्रकार म्हणून फुले-शाहु-आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या दैनिकाच्या मालक तसेच संपादकांच्या हाताखाली केलेल्या कामामुळे मिळालेले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गदर्शन या वेबसाईटचे काम करताना आम्हाला उपयोगी पडले. आमचेही योगदान या माहितीयुगात समाजासाठी उपयोगी ठरावे यासाठी newshindindia.com या स्वत:च्या मालकीच्या वेबसाईटच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहितीपुर्ण व सत्य बातम्या वाचावयास मिळतील याची आम्ही खात्री येथे देतो.
संतोष काशिनाथ सकपाळ
संपादक
(न्युजहिंदइंडिया)