Mumbai, 21 जुलै २०२२: कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स गॅरण्टीड वन पे अॅडवाण्टेज प्लान सादर करत आहे. हा नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्युअल सेव्हिंग्ज लाइफ इन्शुरन्स प्लान सुलभ प्रीमियम पेमेंट आणि स्थिर मुदत देतो. बदलती जीवनशैली आणि भविष्याबाबत अनिश्चितता पाहता कंपनीचे हे नवीन उत्पादन पॉलिसी कालावधीदरम्यान कुटुंबाला आर्थिक संरक्षणाची खात्री देते आणि हमीपूर्ण मॅच्युरिटी लाभ देते. एक-वेळ त्रासमुक्त बचतींचा शोध घेत असलेले ग्राहक गॅरण्टीड वन पे अॅडवाण्टेजचा अवलंब करू शकतात. हे उत्पादन बाजारपेठ स्थिती कशीही असली तरी विमाकृत व्यक्ती किंवा कुटुंबाला जीवन विमा आणि हमीपूर्ण मॅच्युरिटी लाभ देईल.
हे उत्पादन दोन कव्हरेज पर्याय देते: सिंगल लाइफ आणि जॉइण्ट लाइफ कव्हरेज. जीवनातील कोणत्याही अनपेक्षित स्थितीमध्ये ग्राहक पॉलिसी सरेंडर व्हॅल्यूपर्यंत पोहोचल्यानंतर कर्ज सुविधेचा देखील लाभ घेऊ शकतात. पॉलिसीच्या सुरूवातीला पॉलिसीधारकास पॉलिसी लाभांची हमी आधीच दिली जाते. खात्रीशीर परतावा असलेले हे उत्पादन ग्राहकांना दीर्घकाळात संपत्ती निर्मितीसह जीवनातील महत्त्वाची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात निश्चितच मदत करेल.
गॅरण्टीड वन पे अॅडवाण्टेज प्लानच्या लाँचबाबत बोलताना कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुज माथूर म्हणाले, ”आमच्या नवीन ऑफरिंगच्या सादरीकरणासह आमचा ग्राहकांना सुलभ व संतुलित जीवन विमा उत्पादन देण्याचा मनसुबा आहे, जे त्यांना बाजारपेठेतील स्थिती कशीही असो त्यांची आर्थिक उद्दिष्टे संपादित करण्यामध्ये सक्षम करेल. वन पे ग्राहकांना एका सिंगल प्रीमियम पेमेंटसह त्यांचे स्वत:चे आणि त्यांच्या कुटुंबांचे संरक्षण करण्याची सुविधा देईल.”