BHAKTI DHAM

सोनी सबवरील मालिका ‘धर्म योद्धा गरूड’मधील निधी शेठ ऊर्फ पार्वती म्‍हणते, “मालिकेमध्‍ये देवतेची भूमिका साकारणे आव्‍हानात्‍मक आहे’’

नवरात्री म्‍हणजे दुष्‍टावर सुष्‍टाच्‍या विजयाचे साजरीकरण. देशभरात हा सण अत्‍यंत उत्‍साहात व जल्‍लोषात साजरा केला जातो. या सणामध्‍ये माँ दुर्गा आणि नवदुर्गा म्हणून ओळखल्या जाणार्‍या तिच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते. सोनी सबवरील लोकप्रिय पौराणिक मालिका ‘धर्म योद्धा गरूड’ आगामी एपिसोडमध्‍ये नवरात्रीचे महत्त्व सांगण्‍यात येणार आहे. पार्वती, दुर्गा व सतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधीने मालिकेमधील तिची भूमिका, तिने या भूमिकेसाठी केलेली तयारी आणि या भूमिकेमुळे तिच्‍या जीवनात झालेले बदल याबाबत प्रांजळपणे सांगितले. १. मालिकेमध्‍ये देवता दुर्गा/ पार्वती/ सतीची भूमिका साकारण्‍याचा अनुभव कसा राहिला आहे? मागील काही महिने अत्‍यंत व्‍यस्‍त व कष्‍टाचे राहिले आहेत. पण मला सांगावेसे वाटते की, मी प्रत्‍येकवेळी दैवी अवतार घेतल्‍यानंतर मिळणारा अनुभव लक्षवेधक व सुंदर राहिला आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर हा अनुभव अत्‍यंत दैवी राहिला आहे. हा लुक परिपूर्ण दिसण्‍यासाठी संपूर्ण टीमने अथक मेहनत घेतली आहे. २. कथानकाला वास्‍तविक रूपात सादर करणे किती अवघड आहे? मला खात्री आहे की, निर्माते कलाकारांना पटकथा व कथानक सांगण्‍यापूर्वी त्‍यासंदर्भात अथक मेहनत घेतात आणि अनेक गोष्‍टींचे संशोधन करतात. आम्‍ही अगदी मनापासून संवाद योग्‍यरित्‍या सादर करण्‍यासाठी मेहनत घेतो आणि कथानकाला न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न करतो. मी आमच्‍या विश्‍वासाला सन्‍मानित करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. म्‍हणूनच अशा शैलीमधील मालिकांना पौराणिक म्‍हणतात. ३. तुझ्या लुकवर काम करण्‍यासाठी किती वेळ लागतो? आपल्‍याला माहित असावी अशी काही विशिष्‍ट गोष्‍ट आहे का? सामान्‍यत: लुक तयार करण्‍यासाठी अडीच ते तीन तास लागतात. पण दिवसातून दोन किंवा कधी-कधी तीन लुक्‍स धारण करताना खूप रोमांचक व उत्‍साहपूर्ण वाटते. मला आठवते की, मी पार्वती ते सतीमध्‍ये बदलताना तीन बदल केले होते आणि अखेर दुर्गाजीचे रूप धारण करून एका दिवसातील काम पूर्ण केले होते. माझ्या सर्व मेकअप, केशभूषा, कॉस्‍चूम व प्रॉडक्‍शन टीम आव्‍हाने दूर करत माझे लुक तयार करण्‍यासासाठी अथक मेहनत घेत आहेत. मी आगामी नवदुर्गा एपिसोडसाठी ९ दुर्गा लुक्‍स साकारणार असल्‍यामुळे आम्‍हा सर्वांसाठी हे काम अधिक आव्‍हानात्‍मक होणार आहे. मी त्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. ४. अस्‍सल लुक राखणे आव्‍हानात्‍मक आहे का? कोणत्‍याही वधूला तयार होण्‍यासाठी कराव्‍या लागणाऱ्या कसरतीप्रमाणे दररोज देवीचे लुक धारण करणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक आहे. दररोज हे लुक धारण करण्‍यासाठी १२ तासांहून अधिक वेळ लागतो. पण अशी सकारात्‍मक भूमिका साकारताना त्‍यामधून पुढे जात राहण्‍यास ऊर्जा व उत्‍साह मिळतो. ५. मालिकेमध्‍ये ही भूमिका साकारत असताना तुझ्या वैयक्तिक जीवनात काही बदल झाले आहेत का किंवा जीवनाप्रती तुझा दृष्टिकोन बदलला आहे का? होय माझ्यावर प्रेमळ व अत्‍यंत सकारात्‍मक परिणाम झाला आहे. मला माझ्या अवतीभोवती व सेटवर उत्‍साहपूर्ण ऊर्जा जाणवते. पॅकअपनंतर अनेकवेळा मी घरामध्‍ये आनंदाने जाते, जे पाहून माझ्या कुटुंबातील सदस्‍य अचंबित होतात, पण ते देखील आनंद घेतात, त्‍यामधून शिकतात आणि त्‍यांच्‍या जीवनात देखील त्‍याचा अवलंब करण्‍याचा प्रयत्‍न करतात. माझे मन कृतज्ञतेने भरून गेले आहे, पार्वती, सती व दुर्गा यांसारख्‍या दैवी भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍याने मी स्‍वत:ला धन्‍य मानते.

Read more

अभिनेत्री अक्षिता अग्निहोत्री हिने गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात साजरे करत बाप्पाला निरोप दिल

दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्या सुलतान ऑफ दिल्ली या वेब सीरिजमध्ये काम करणारी अभिनेत्री अक्षिता अग्निहोत्री, जी किंगफिशर कॅलेंडरची फायनल होती,...

Read more

रंगरात्री दांडिया नाईट्स चे भूमिपूजन संपन्न

  रंगरात्री दांडिया नाईट्सचे भूमिपूजन सुनील राणे यांच्या हस्ते संपन्न दुर्गादेवी नवरात्र उत्सव समिती बोरिवली आणि श्री सुनील राणे यांच्यातर्फे प्रीमियम...

Read more

बँकर-अभिनेत्री पम्मी मोटनने बॉलीवूड सेलिब्रिटी प्रतीक व्होरा, हितेश तेजवानी, पवन जागोली आणि कविता दत्त यांच्यासह गणेश विसर्जन केले

कॉर्पोरेट गर्ल आणि बँकर राहिलेली पम्मी मोटन फिल्मी दुनियेत अभिनेत्री म्हणून काम करत आहे. फॅशन शोपासून टीव्ही मालिकेपर्यंत आणि संगीत...

Read more

घरगुती गणपतींचे विसर्जन दादर, माहीम चौपाटीवर अधिक; गणेशभक्तांची विसर्जनासाठी गर्दी कायम

मुंबई : लालबाग, गिरगांव परिसरात सकाळपासून गणपती विसर्जनाचा सुरू झालेला जल्लोष आणि गिरगाव चौपाटीवर असलेली गर्दी पाहता तुलनेने दादर, माहीम परिसरात...

Read more

विसर्जनाच्या दिवशी विघ्न! गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासह वाहनांवर झाड कोसळलं, 5 जण जखमी

ठाणे : गणपती विसर्जनाच्या  दिवशी एका दुर्दैवी घटना ठाण्यात घडली. ठाण्यात एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावरच भलामोठा वृक्ष  कोसळला. काही गाड्यादेखील...

Read more

‘वर्षा’वरील बाप्पांचे मुख्यमंत्री शिंदे, श्रीकांत शिंदेंनी केले विसर्जन

  'वर्षा'वरील बाप्पांचे मुख्यमंत्री शिंदे, श्रीकांत शिंदेंनी केले.  विसर्जन कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या विघ्नानंतर राज्यात यंदा निर्बंधांविना गणेश उत्सव साजरा...

Read more

गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना:पनवेलमध्ये 11 भाविकांना विजेचा शॉक, काहींची प्रकृती चिंताजनक; जळगाव, नांदेडमध्ये युवक बुडाले

कोविडच्या 2 वर्षांनंतर राज्यभरात गणेश विसर्जन उत्साहात झालेले असतानाच काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. पनवेलमध्ये विसर्जन...

Read more

गणपती बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच का? वाचा

मुंबई : देशात सर्वत्र जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाने भक्तगण आनंदात आहेत. १० दिवस सर्वजण...

Read more

कोकणात गौराईचा धुमधडाक्यात आगमन

(संतोष सकपाळ) सासुरवासींनी-माहेरवासींनीचा आनंदमेळा गणरायांच्या आगमनापाठोपाठ काल (३ सप्टेंबर २०२२) जेष्ठागौरींचे मोठ्या थाटात आगमन झाले. गौरी आगमन, गौरीपूजन हा माहेरवासीनींबरोबरच...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News