‘वर्षा’वरील बाप्पांचे मुख्यमंत्री शिंदे, श्रीकांत शिंदेंनी केले. विसर्जन कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या विघ्नानंतर राज्यात यंदा निर्बंधांविना गणेश उत्सव साजरा होत आहे. विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी सकाळपासून ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
आता सर्वच उत्सव धुमधडाक्यात
मुख्यमंत्री्एकनाथ शिंदे म्हणाले, गणपतीचे विसर्जन आज होत आहे. जल्लोष खूप आहे. गत दोन वर्षांपासूनची मरगळ संपली. गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. आता नवरात्रोत्सवही धुमधडाक्यात साजरा होणार आहे. राज्यात पुरामुळे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची घोषणा मी केली आहे.