NHI \ AGENCY NEWS
मुंबई: पडद्यावरील कलेसाठीची UK मधील अग्रगण्य चॅरिटी संघटना BAFTA नेटफ्लिक्सच्या सहयोगाने भारतामध्ये आपल्या ब्रेकथ्रू प्रोग्रामचे चौथे पर्व घेऊन आली आहे. बाफ्टा ब्रेकथ्रू इंडिया फिल्म्स, गेम्स आणि टेलिव्हिजन उद्योगक्षेत्रामध्ये कार्यरत नव्या पिढीच्या प्रतिभावंत व्यावसायिकांचे कसब ओळखून त्यांचा गौरव करणारा मंच आहे. यावर्षी दुसऱ्यांदा BAFTA ब्रेकथ्रू प्रोग्रामने भारत, US आणि UK प्रांतांसाठी एकाचवेळी आपली अर्जनोंदणी खुली केली आहे.
बाफ्टा ने आपल्या मार्गदर्शन आणि प्रतिभाशोध कार्यक्रमाच्या माध्यमातून कितीतरी सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रामधील अडथळ्यांवर मात करण्यास मदत करणाऱ्या, त्यांच्या कौशल्यांना अधिक निपुण बनविणाऱ्या आणि त्यांच्या कारकिर्दीला चालना मिळावी अशाप्रकारे त्यांना सहकार्य पुरविणाऱ्या एका सर्वसमावेशी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपापल्या कौशल्याचा पाठपुरावा करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
ही संधी मिळविणाऱ्या ‘ब्रेकथ्रूज’ना या उद्योगक्षेत्रातील धुरिणांबरोबर होणाऱ्या एकास-एक संवादामध्ये तसेच गटचर्चांमध्ये सहभागी होतील. आपले व्यावसायिक आणि निर्मिती कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. बाफ्टा सदस्यत्वाच्या माध्यमातून आपल्या उद्योगक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या जगभरातील व्यक्तींबरोबर संपर्कजाळे बनविण्याच्या संधीबरोबरच या प्रोग्रामच्या कालावधीमध्ये होणाऱ्या म्हणजेच १२ महिन्यांमध्ये बाफ्टा च्या सर्व प्रशिक्षण, विकास आणि नेटवर्किंग उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचीही संधी विजेत्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर जनसंपर्काचे पाठबळ लाभलेली सादरीकरणाची PR backed showcase संधीही या ब्रेकथ्रूजना मिळणार आहे.
बाफ्टा चे लर्निंग, इन्क्लुजन, पॉलिसी अँड मेंबरशिपसाठीचे एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर टिम हंटर म्हणाले, “आम्हाला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, बाफ्टा ब्रेकथ्रू इंडियासाठीची अर्जनोंदणी पुन्हा एकदा खुली झाली आहे. नेटफ्लिक्सकडून मिळालेल्या उदार पाठिंब्यामुळे या उपक्रमातून भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन आणि गेम्स उद्योगक्षेत्रात काम करणाऱ्या असाधारण प्रतिभावंतांच्या एका अख्ख्या फळीची जडणघडण होताना दिसणार आहे आणि या मंडळींनी या वर्षाच्या उत्तरार्धात सुरू होत असलेल्या आमच्या वैश्विक सदस्यत्वधारकांसमोर आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे.”
नेटफ्लिक्स इंडियाच्या व्हाइस प्रेसिडंट कंटेंट, मोनिका शेरगिल म्हणाल्या, “BAFTA ब्रेकथ्रू इंडिया प्रोग्राम हा उदयोन्मुख सर्जनशील अविष्कारांना बळ देण्याच्या आणि त्यांना जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर करण्याच्या नेटफ्लिक्सच्या ध्येयधोरणाशी अचूक मेळ साधणारा आहे. या उपक्रमातून गेल्या चार वर्षांमध्ये हाती लागलेल्या अभिजात गुणवत्तेमधील वैविध्य हे या कार्यक्रमाला मिळालेल्या उदंड यशाचे द्योतक आहे. BAFTA बरोबरचा हा सहयोग पुढे सुरू ठेवण्यास आणि भारतातील सर्जनशील अभिव्यक्तीच्या नव्या पिढीचा शोध घेऊन तिची जोपासना करण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.”
सिख्या एंटरटेन्मेंटचे संस्थापक आणि सीईओ, फिल्म निर्माता आणि ब्रेकथ्रू इंडियाचे अॅम्बेसेडर गुनीत मोंगा कपूर म्हणाले, “भारतामध्ये सर्जनशील प्रतिभावंतांची विपुलता आहे हे ब्रेकथ्रूच्या याआधीच्या तीन पर्वांमधून सिद्ध झाले आहे. मी एका अशा काळात लहानाचा मोठा झालो जेव्हा अशाप्रकारच्या संधी मिळण्याची कल्पनाही करणे शक्य नव्हते. भारतातील चित्रपट, टेलिव्हिजन आणि गेम्सच्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सर्जनशील कलावंतांच्या नव्या पिढीने या वर्षीच्या कार्यक्रमासाठी अर्ज करावा यासाठी मी त्यांना आवर्जून प्रोत्साहित करू इच्छितो. BAFTA ब्रेकथ्रू आपल्या उद्योगक्षेत्रातील तरुण चेंजमेकर्सना अनमोल अशी संसाधने देऊ करते आणि यंदाच्या वर्षी या कार्यक्रमात सहभागी होणारे आपल्या कौशल्यांना परजण्यासाठी आणि भारतीय स्क्रीन इंडस्ट्रीजना एका आंतरराष्ट्रीय मंचावर घेऊन जाण्यासाठी या संधींचा वापर करून घेत असताना त्याचे साक्षीदार बनण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.”