मुंबई : लालबाग, गिरगांव परिसरात सकाळपासून गणपती विसर्जनाचा सुरू झालेला जल्लोष आणि गिरगाव चौपाटीवर असलेली गर्दी पाहता तुलनेने दादर, माहीम परिसरात मात्र दुपारपर्यंत विसर्जन शांततेत सुरू होते. दुपारी तीन वाजेपर्यंत घरगुती गणपतीचे विसर्जन अधिक झाले.
सकाळी ८ ते दुपारी तीन वाजेपर्यंत दादर शिवाजी पार्क चौपाटी आणि माहीम चौपाटी येथे एकूण सात ठिकाणी १२९ घरगुती आणि १४ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले. दादर शिवाजी पार्क चौपाटी आणि माहीम चौपाटी येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मुंबई पालिकेकडूनही चौपाट्यांवर कर्मचारी तैनात केले होते. विसर्जनाला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलीसही वाहने हटवित होते. चौपट्यांवर येणारे गणेशभक्त गणरायाला अखेरचा निरोप देताना भावुक झाले होते दुपारनंतर मात्र आता विसर्जनासाठी गर्दी वाढू लागली आहे.