दिवा, ता. 25 डिसेंबर (बातमीदार) – भाजपाचे युवा मोर्चा ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस डॉ सतीश केळशीकर यांच्या वाढदिवसा निमित्त दिवा भाजपा व प्लाजमा ब्लड बँक, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर राबवण्यात आले होते. त्यावेळी दिव्यातील जनतेसाठी पाच लाखाचं मोफत हेल्थ कार्ड विमा काढून देण्यात आला. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. भाजपा दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर व दत्ता पाटील (टायगर ग्रुप ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष) यांच्या हस्ते रीबन कापून रक्तदोन शिबिराची सुरवात करण्यात आली. प्रसंगी दिवा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सपना रोशन भगत, प्रफुल साळवी, रोशन भगत, विजय भोईर, नितीन कोरगावकर, किरण कोरगावकर, रवी मामुणकर, हिमांशु राजपूत (सचिव भाजपा युवा मोर्चा ठाणे शहर), हिमेश कडवे (उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ठाणे शहर), अंकित हजारे (युवा वॉरियॉर ठाणे शहर प्रमुख भाजपा युवा मोर्चा), अरुण कोनार (सचिव मध्यमंडल साकेत) यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.