• आगामी 12-18 महिन्यांत मुंबई आणि पुण्यात आणखी 10 सेंटर उघडण्यासाठी रू. 225 कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करणार
मुंबई / 3 ऑक्टोबर, 2023: डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल्स, चेंबूर, मुंबई’च्या वतीने सिग्नेचर बिझनेस पार्क येथे अत्याधुनिक नेत्रसेवा रुग्णालय सुरू करण्यात आले. जवळपास 7,500 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या सुविधाकेंद्राचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आणि संगीतकार, पद्मश्री शंकर महादेवन यांच्या हस्ते करण्यात आले; यावेळी डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. अमर अग्रवाल; डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल्सचे सीईओ डॉ. आदिल अग्रवाल; तसेच डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल्स, चेंबूर’च्या हेड- क्लिनिकल सर्व्हिसेस्, डॉ. नीता ए. शाह यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल्स’चे अध्यक्ष डॉ. अमर अग्रवाल म्हणाले: “लोकांकरिता जागतिक दर्जाची नेत्रसेवा देण्यासाठी मुंबईत ही अत्याधुनिक सुविधा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. हे शहरातील आमचे दहावे रुग्णालय आहे. आम्ही 2017 मध्ये पुण्यातील सेंटरसह महाराष्ट्रात प्रवेश केला आणि 2019 मध्ये मुंबईत त्वरीत विस्तार केला. आता आमच्याकडे राज्यात मुंबई, नाशिक, पुणे आणि सातारासारख्या ठिकाणी 20 नेत्रसेवा रुग्णालये कार्यरत आहेत. याप्रकरचा विस्तार म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. महाराष्ट्रात आणखी किमान 50 नेत्र रुग्णालये सहजपणे सामावून घेता येतील असा विश्वास आम्हाला वाटतो. आगामी 12 ते 18 महिन्यांत, आम्ही मुंबई आणि पुणे शहरांमध्ये आणखी 10 सेंटर सामावून घेण्यासाठी रू. 225 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत.”
डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल्स’चे सीईओ डॉ. आदिल अग्रवाल म्हणाले: “मुंबईतील आमच्या नेत्रसेवा सेवांचा विस्तार सुलभतेत भर टाकणारा आहे, प्रतीक्षा कालावधी कमी होतो आहे आणि प्रदेशातील प्रत्येकासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करण्यात येते आहे. पुढील सहा महिन्यांत, आम्ही मुंबईतील संपूर्ण सेंट्रल लाईन आणि पुढील दोन वर्षांत वेस्टर्न आणि हार्बर लाईन कव्हर करू. आमचे मूळ राज्य असलेल्या तामिळनाडूबाहेर, महाराष्ट्र हे राज्य आहे, ज्याबद्दल आम्हाला सर्वात जास्त उत्साह वाटतो. आम्ही या बाजारपेठेत आश्चर्यकारक वाढ अनुभवली आहे.”
ते पुढे म्हणाले: “आम्ही मागील तीन आर्थिक वर्षांपासून महाराष्ट्रात पाच पटीने वाढलो आहोत, आर्थिक वर्ष 20 मधील 4 रुग्णालयांवरून आज 20 रुग्णालये झाली आहेत आणि पुढील 6 महिन्यांत आणखी 5 रुग्णालये जोडण्याची अपेक्षा आहे. आमचा अल्प-मध्यम-मुदतीचा विकास प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यापुरती केंद्रित असेल. तथापि, महाराष्ट्रात दीर्घकालीन विस्तारासाठी, आम्ही राज्यातील 50 रुग्णालयांच्या संख्येपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या प्रयत्नात नागपूर, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, कोल्हापूर, अकोला आणि नांदेडसारख्या नवीन बाजारपेठांचा शोध घेत आहोत. या विस्तारामध्ये ग्रीनफिल्ड आणि ब्राऊनफिल्ड संस्थांचा समावेश असेल.
डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल्स, चेंबूर, मुंबई येथील क्लिनिकल सर्व्हिसेस -हेड डॉ. नीता ए शहा, म्हणाल्या: “चेंबूर येथील सुविधाकेंद्र म्हणजे एक पूर्ण-सेवा-नेत्र तपासणी आणि उपचार सुविधा आहे. याठिकाणी रुग्णांना नेत्रसेवेशी निगडीत संपूर्ण श्रेणी उपलब्ध होते. ज्यामध्ये आठ उच्च अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तीन मॉड्यूलर ऑपरेटिंग रूम्ससोबत पात्र डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळयातील पडदा (रेटिना), ग्लुकोमा (काचबिंदू), कॉर्निया आणि लेझर विजन करेक्शन स्वरूपातील इष्टतम डोळ्यांची काळजी घेण्यासाठी जागतिक दर्जाच्या प्रक्रिया प्रदान करते. या उपलब्ध सुविधांमध्ये इन-हाउस ऍनेस्थेसिया सुविधा, स्कॅन, आयओएल मास्टर, पेरिमेट्री, पॅचीमेट्री, टोपोग्राफी, ओसीटी, सिनोप्टोफोर, याग लेसर, ग्रीन लेसर, संगणकीकृत ड्राय आय चेक-अप, ऑप्टिकल आणि कॉन्टॅक्ट लेन्स, फार्मसी आणि लॅबोरेटरी यांचा समावेश आहे. रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत विशेष डॉक्टरांची उपलब्धतेसह कार्यरत मुंबईतील आम्ही डोळ्यांशी संबंधित एकमेव सेवा पुरवठादार असू.”
यंदा ऑगस्ट महिन्यात डॉ. अग्रवाल्स हेल्थ केअरच्या वतीने जागतिक गुंतवणुकदारांकडून रू. 650 कोटी उभारण्यात आले. सध्या त्यांची 150 हून अधिक केंद्रे आहेत आणि पुढील 3 वर्षांत त्याचे संपर्कजाळे दुप्पटीने वाढविण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य भारतातही आक्रमकपणे विस्तार होत असून सध्याच्या बाजारपेठांमध्ये अधिक खोलवर प्रवेश करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. तसेच पुढील काही वर्षांत टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये 100 हून अधिक प्राथमिक नेत्र चिकित्सालय स्थापन होतील.