मँगो फ्लेवर्ड टिक टॅक भारतातील आंब्याच्या सीझनमध्ये धुमाकूळ निर्माण करणार
NHI/NEWS AGENCY
मुंबई,: उन्हाळ्यामध्ये स्वादिष्ट चवींचा आस्वाद घ्यायचा आहे का? तर मग, जगातील स्वीट-पॅकेज उत्पादनांची आघाडीची उत्पादक फेरेरो इंडियाचा (फेरेरो ग्रुपची भाग) कन्फेक्शनरी ब्रँड टिक टॅकने तुमच्यासाठी परिपूर्ण समर सरप्राइज आणले आहे. ब्रँडने लिमिटेड-एडिशन मँगो फ्लेवर्ड टिक टॅक लाँच केले आहे, जे भारतातील शहरी बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल.
भारतीय उन्हाळ्यामध्ये फळांचा राजा आंब्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात आणि ही प्रथा आपल्या देशाच्या संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग बनली आहे. आंब्याचा रसाळ स्वाद नेहमीच आल्हाददायी असतो आणि लाँच करण्यात आलेले हे नवीन टिक टॅक फ्लेवर फळांची आवड असलेल्या, तसेच चालता-फिरता फळांच्या रसाळ स्वादाचा आस्वाद घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी पर्वणी आहे. टिक टॅक पोर्टफोलिओमधील इतर मिंट्सच्या तुलनेत हे नवीन व्हेरिएण्ट ग्राहकांना फ्लेवरमध्ये अस्सल आंब्याचा स्वाद देण्यासोबत पॅकेजिंग कलर्स – ब्राइट येलो, रिफ्रेशिंग मिंटचा अनुभव देखील देईल.
टिक टॅकच्या ग्राहक पसंतींवरील संशोधनामधून निदर्शनास आले की, भारतीय कन्फेक्शनरीप्रेमींचा आंबा आवडता फ्लेवर आहे. हे नवीन मँगो टिक टॅक ग्राहकांना प्राधान्य देण्यासोबत आपल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या माध्यमातून त्यांच्या पसंती व मागण्यांची पूर्तता करण्याप्रती ब्रँडच्या कटिबद्धतेशी संलगन आहे.
फेरेरो इंडिया येथील विपणन प्रमुख (पिल्स अँड गम्स) श्री. झोहेर कापूसवाला म्हणाले, ”फेरेरो इंडियामध्ये आमचे सर्व प्रॉडक्ट इनोव्हेशन्स स्थानिक ग्राहकांच्या पसंतींची पूर्तता करण्यासह त्यांना अपेक्षित सर्वोत्तम उत्पादने देतात. हा हंगामी ट्रॉपिकल फ्लेवर प्रदान करत टिक टॅकचा भारतातील समर सीझनला साजरे करण्यासोबत ग्राहकांना आंब्याच्या अस्सल स्वादाचा अनुभव देण्याचा मनसुबा आहे.”
भारतातील शहरी बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेले नवीन मँगो टिक टॅक दोन पॅक्समध्ये येते, ज्यांची किंमत अनुक्रमे १५ रूपये (९.७ ग्रॅम) आणि २० रूपये (१३ ग्रॅम) आहे. हे लाँच ब्रँडसाठी विकासाला अधिक चालना देण्याचे आणि भारतीय कन्फेक्शनरी बाजारपेठेतील आघाडीची कंपनी म्हणून टिक टॅकचे स्थान अधिक दृढ करण्याचे काम करेल.
थिंक मँगो! थिंक टिक टॅक!