देशांमधील द्विपक्षीय व्यापार संबंध सुलभ करण्यासाठी तैवान एक्स्पो प्रमुख व्यासपीठ
मुंबई, २७ सप्टेंबर, २०२३: नेस्को एक्सिबिशन सेंटर , गोरेगाव येथे दिनांक ५ ते ७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत; बहुप्रतिक्षित, तैवान एक्स्पो- २०२३ भारतामध्ये व्यापाराची व्याप्ती वाढविण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतातील एक्स्पोची ही ६वी आवृत्ती असून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये भारतीय व्यापाऱ्यांना तैवानमधील व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे त्यामुळे प्रदर्शक आणि अभ्यागतांना उत्पादन पोर्टफोलिओसह अधिक जवळून पाहण्याची आणि सखोल अनुभवात्मक संवाद साधता येईल. यंदाच्या एक्स्पोमध्ये स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, स्मार्ट सिटी, स्मार्ट ऍग्रीकल्चर स्मार्ट लाइफस्टाइल या प्रमुख श्रेणींमध्ये ६ थीम, ७ पॅव्हेलियन प्रदर्शनात असतील;
UAV from Ahamani EV Technology Co. Ltd, world’s first 5G Mixed reality glasses from Compal Electronics Inc, Hydrogen 2-3 wheels motorcycle from Chung Hsin Electric & Machinery Manufacturing Corporation and EV power system from Teco Electric and Machinery Co. Ltd ही या एक्स्पो मध्ये सहभागी होणाऱ्या काही प्रमुख कंपन्यांची नावे आहेत
यावर बोलताना तैवान एक्स्टर्नल ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिलचे ( तैत्रा) उप कार्यकारी संचालक के जे चेंग म्हणाले, “भारतात तैवान एक्स्पोच्या आणखी एका आवृत्तीचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत आहे. हा एक्स्पो अलीकडील सरकारी धोरणे, स्थानिक बाजारातील मागणी आणि सध्याच्या ट्रेंडवर आधारित नवीनतम उत्पादने प्रदर्शित करणार आहोत. शिवाय, तैवान आणि भारतातील व्यवसायांमधील परस्परसंवादाला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक्स्पो नेटवर्किंग इव्हेंट्स आयोजित करीत आहोत, ज्यामध्ये वन-ऑन-वन बिझनेस मॅच मीटिंग आणि विविध स्टेज इव्हेंटचा समावेश आहे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार संबंधांना चालना देणारा सर्वोत्तम टप्पा निर्माण करणे व सुरू ठेवण्याची आम्हाला आशा आहे.”
तैवान एक्स्टर्नल ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिल (तैत्रा) द्वारे आयोजित केलेले, तैवान एक्स्पो २०२३ हे तैवान आणि भारतासह एशियन देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी एक प्रमुख प्रदर्शन आहे. २०१७ मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, तैवान एक्स्पो हे तैवानी व्यवसायांसाठी एशियन, दक्षिण आशिया आणि उत्तर अमेरिकेत नवीन संधी शोधण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि भागीदारी करण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. अशा प्रकारे, एक्स्पोला एशियन देश आणि भारतातील प्रमुख ऑनलाइन सोर्सिंग हब म्हणून श्रेय दिले जाते. भारतासोबत द्विपक्षीय व्यापार संबंधांना चालना देण्यासाठी तैवानच्या मजबूत आणि दीर्घकालीन वचनबद्धतेचा हा पुरावा आहे.
तैवान सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, भारत हा त्याचा १६ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि १३ वा सर्वात मोठा निर्यात गंतव्य आहे. हे लक्षात घेणे जरुरी आहे की भारत आणि तैवानमधील द्विपक्षीय व्यापार २०२२ मध्ये एकूण $ ८.४६ अब्ज होता, जो २०२१ च्या तुलनेत ९.८६% ची वाढ दर्शवतो.
अलिकडच्या वर्षांत, जागतिक पुरवठा साखळी फ्रेमवर्कमध्ये भारत स्वतःला एक व्यवहार्य पर्यायी केंद्र म्हणून तयार करत आहे आणि सध्याची भू-राजकीय आणि आर्थिक परिस्थिती भारत आणि तैवान या दोन्ही देशांना मजबूत व्यावसायिक द्विपक्षीय संबंधांद्वारे परस्पर फायदेशीर व्यावसायिक संबंध साध्य करण्यासाठी सहकार्यासाठी नेव्हिगेट करण्याची संधी प्रदान करते.
२०१७ पासून, तैवान एक्स्पो तैवानच्या व्यवसायिकांसाठी नवीन संधी शोधण्यासाठी, नावीन कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि द असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स (ASEAN ) या संघटनेमध्ये मध्ये भागीदारी करण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. तैवान एक्स्पो आतापर्यंत भारत, थायलंड, इंडोनेशिया, फिलीपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया आणि यूएसए यासह सात देशांमधील ११ शहरांमध्ये १५ वेळा यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले आहे.