· भारतातील सर्व राज्यांना व्यापून घेणाऱ्या पहिल्या सर्वसमावेशक संशोधनामधून व्यापक एनसीडी प्रमाण निदर्शनास येते.
· ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागांमध्ये सर्व चयापचय एनसीडींचे सर्वोच्च प्रमाण आहे.
· राज्यांमधील एनसीडींच्या प्रमाणामध्ये व्यापक फरक.
· अधिक विकसित राज्यांमध्ये, मधुमेहाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे, तर कमी विकसित राज्यांत प्रादुर्भावामध्ये आणखी तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : आयसीएमआरने निधीसाह्य केलेल्या सर्वसमावेाश्क एपीडेमियोलॉजिकल संशोधनाचे उल्लेखनीय संशोधन पत्रक जागतिक स्तरावर प्रशंसित मेडिकल जर्नल द लॅन्सेट डायबिटीज एण्ड एण्ड्रोक्रिनोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर, भारत सरकार यांनी निधीसाह्य केलेले संशोधन पत्रक – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-इंडिया डायबिटीज (आयसीएमआर-आयएनडीआयएबी) धक्कादायकपणे निदर्शनास आणते की, भारतात चयापचय नॉन-कम्युनिकेबल डिसीजेज (एनसीडी) (असंसर्गजन्य रोग) चे प्रमाण अधिक आहे. २० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रौढ व्यक्तींच्या या क्रॉस-सेक्शनल, लोकसंख्या-आधारित सर्वेक्षणामध्ये देशातील ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण १,१३,०४३ व्यक्तींचे (३३,५३७ शहरी आणि ७९,५०६ ग्रामीण रहिवासी) स्तरीकृत, मल्टीस्टेज सॅम्पलिंग डिझाइन वापरून नमुना घेण्यात आला. शहरी व ग्रामीण भारतातील व्यक्तींच्या या व्यापक प्रातिनिधिक नमुन्यामध्ये संशोधनाने मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा व डिस्लिपिडेमिया यांसारख्या चयापचय एनसीडींच्या प्रमाणाचे मापन केले. तसेच देशातील या एनसीडींचया प्रमाणात प्रादेशिक व राज्य-स्तरीय फरक देखील ओळखण्यात आले.
शहरी व ग्रामीण तफावत: ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागांमध्ये सर्व चयापचय एनसीडींचे सर्वोच्च प्रमाण आहे, ज्यामध्ये प्रीडायबिटीज अपवाद आहे.
मधुमेह व इतर एनसीडींसाठी नवीन राष्ट्रीय अंदाज: आमच्या संशोधनामधून निदर्शनास येते की, २०२१ मध्ये भारतात १०१ दशलक्ष व्यक्तींना मधुमेह होता आणि १३६ दशलक्ष व्यक्ती प्रीडायबिटीज होते, ३१५ दशलक्ष व्यक्तींना उच्च रक्तदाब होता, २५४ दशलक्ष व्यक्तींना सामान्यीकृत लठ्ठपणा होता आणि ३५१ दशलक्ष व्यक्तींना ओटीपोटीत लठ्ठपणा होता. तसेच २१३ दशलक्ष व्यक्तींना हायपरकोलेस्टेरोलेमिया होता.
डॉ. मोहन्स डायबिटीज स्पेशालिटीज सेंटर (डीएमडीएससी)च्या व्यवस्थापकीय संचालक व मद्रास- डायबिटीज रिसर्च फाऊंडेशन (एमडीआरएफ)च्या अध्यक्ष डॉ. आर. एम. अंजना म्हणाल्या, ‘‘एमडीआरएफमध्ये आम्हाला आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या मोठ्या पाठिंब्यासह संशोधनासाठी राष्ट्रीय समन्वयक केंद्र म्हणून या अवघड कार्याचे नेतृत्व करण्याचा अभिमान वाटतो. या सखोल अहवालाचा एसीडींसंदर्भात देशासाठी आरोग्यसेवा धोरणांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या अंदाजांच्या तुलनेत भारतात सध्या चयापचय एनसीडींचे सर्वोच्च प्रमाण आहे. भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, जेथे काही राज्यांमध्ये प्रमाण सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे, तर इतर राज्यांमध्ये प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली आहे. संशोधनामधून निदर्शनास येते की, शहरी भागांमध्ये सर्व चयापचय एनसीडी अधिक सामान्य असले तरी ग्रामीण भागांमध्ये देखील यापूर्वी नोंदणी झाल्याच्या प्रमाणाच्या तुलनेत प्रादुर्भावाचे सर्वाधिक प्रमाण आहे.’’
डॉ. मोहन्स डायबिटीज स्पेशालिटीज सेंटर (डीएमडीएससी) व मद्रास डायबिटीज रिसर्च फाऊंडेशन (एमडीआरएफ)चे अध्यक्ष आणि संशोधनाचे वरिष्ठ लेखक डॉ. व्ही. मोहन म्हणाले, ‘‘एमडीआरएफ सदस्यांच्या समर्पित व प्रशंसनीय प्रयत्नांसह आम्ही जगभरातील लाखो व्यक्तींना होणारे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब व मधुमेह यांसारख्या एनसीडींच्या प्रमाणाचे मूल्यांकन करण्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत. आमच्या संशोधनामधील निष्पत्तींचे भारतातील आरोग्यसेवेचे नियोजन व तरतूदीसाठी अनेक परिणाम आहेत. आपल्या संबंधित प्रदेशांमध्ये आरोग्यसेवा प्रदान करण्यामध्ये अग्रस्थानी असलेले भारतातील राज्य सरकार विशेषत: या एनसीडींवरील समर्पित राज्य-स्तरीय डेटामध्ये उत्सुक असतील, यामुळे त्यांना एनसीडींचे प्रमाण वाढण्याला यशस्वीरित्या प्रतिबंध करण्यास आणि या आजारांच्या गुंतागूंतींचे व्यवस्थापन करण्यास पुरावा-आधारित हस्तक्षेप विकसित करता येतील.’’
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या नॉन-कम्युनिकेबल डिसीज डिव्हिजनचे सायण्टिस्ट ‘जी’ व प्रमुख डॉ. आर. एस. धलीवाल आणि आयसीएमआरच्या एनसीडी डिव्हिजनचे सायण्टिस्ट ‘जी’ डॉ. तन्वीर कौर यांनी या आयसीएमआर – आयएनडीआयएबी संशोधनाचा भाग असण्याप्रती आनंद व सन्मान व्यक्त केला. या संशोधनासाठी अधिक वेळ, प्रयत्न करण्यात आले, ज्यामधून संशोधन ब्रेकथ्रू मिळाला. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॉन-कम्युनिकेबल डिसीज डिव्हिजनचे सायण्टिस्ट ‘जी’ व प्रमुख डॉ. आर. एस. धलीवाल म्हणाले, ‘‘संशोधन निष्पत्तींमधून स्पष्टपणे दिसून येते की, भारतातील अधिकाधिक व्यक्तींना चयापचय एनसीडींमुळे कार्डियोव्हॅस्कुलर डीसीज आणि इतर दीर्घकालीन अवयव गुंतागूंतींचा धोका आहे.’’
या संशोधनासाठी राष्ट्रीय समन्वयक केंद्र असलेले एमडीआरएफ १५ वर्षांपासून यशस्वीपणे प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या या सविस्तर टास्कमध्ये सामील होते. २८ राज्ये, दोन केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीला व्यापून घेत १,१३,०४३ व्यक्तींच्या व्यापक नमुना आकारासह हे सर्वेक्षण करण्यात आले. या संशोधनाच्या निष्पत्ती प्रतिष्ठित व जागतिक प्रख्यात मेडिकल जर्नल ‘द लॅन्सेट डायबिटीज एण्ड एण्डोक्रिनोलॉजी’मध्ये ८ जून २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आल्या.