ठाणे, : शिक्षण क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव असलेल्या सिंघानिया स्कूल्सने ठाण्यात गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल या विस्तीर्ण नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. शाळा आयसीएसई अभ्यासक्रम सादर करेल आणि जून २०२३ पासून शैक्षणिक वर्ष सुरू होईल. ठाणे शहरात जलद आर्थिक विकास होत असताना हे एक पसंतीचे निवासी स्थळ बनले आहे. त्यामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांची खरी गरज आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील ५० हून अधिक वर्षांच्या उत्कृष्टतेसह सिंघानिया स्कूलची पाळेमुळे ठाणे शहरात आहेत आणि श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळा, श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया शाळा आणि श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया आयबी वर्ल्ड स्कूल (DP) सारख्या शाळा आहेत. नवीन शाळेमध्ये अत्याधुनिक सुविधा, तंत्रज्ञान सक्षम वर्गखोल्या आणि मुलांसाठी अनुकूल सुंदर इंटिरियर्स ठाण्याच्या कावेसर भागात आहेत. रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि सिंघानिया स्कूल्सच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष श्री. गौतम हरी सिंघानिया आणि त्यांची पत्नी श्रीमती नवाज सिंघानिया यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन झाले. या नवीन शाळेची भर पडल्यामुळे आता एकूण सात सिंघानिया शाळांमधून २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल. शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सर्वोच्च सन्मान प्राप्त करण्यासाठी गणले जाणारे सिंघानिया स्कूल्स महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये झपाट्याने आपला ठसा विस्तारत आहे.
विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देत त्यांना पूर्ण क्षमतेने सक्षम बनवण्याच्या संस्थेच्या तत्वाला पुष्टी देताना रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि सिंघानिया स्कूल्सच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष श्री. गौतम हरी सिंघानिया म्हणाले; “शिक्षण हा राष्ट्र उभारणीचा अविभाज्य घटक आहे आणि सिंघानिया शाळांमध्ये नवीन भारताचे नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन आमची भूमिका पार पाडण्याचे आमचे ध्येय आहे. भारतातील १,००,००० मुलांना शिक्षित करणे हे माझे ध्येय असून सिंघानिया शाळांच्या जलद विस्ताराद्वारे ते साध्य करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण केलेल्या आमच्या माजी विद्यार्थ्यांचे यश आमच्या शाळेसाठी सर्वात मोठी कौतुकाची बाब आहे. गेल्या ५ दशकांमध्ये आम्ही असंख्य तरुण मनांचे यशस्वीरित्या पोषण करून त्यांना उज्ज्वल भविष्य साध्य करण्यासाठी मदत केली आहे. मी ही नवीन शाळा भारतातील मुलांना समर्पित करत आहे.”
यावेळी बोलतांना आघाडीच्या शिक्षणतज्ञ, सिंघानिया स्कूल्सच्या संचालक आणि डीन आणि श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या प्राचार्या डॉ. रेवती श्रीनिवासन म्हणाल्या: “या शाळेचा शुभारंभ हा आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देण्याच्या आमचा दृष्टीकोन पुढे नेण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे. आमच्या विद्यार्थ्यांना या गतिमान जगाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम करत आम्ही सहयोगी, अनुभवात्मक आणि संकल्पना धारित शिक्षण, पोषक वातावरण देण्यासाठी वचनबद्ध आहोत. एआय च्या युगात शिक्षण संपूर्णपणे नवीन परिमाण घेत असताना आम्ही नवीन कल्पना निर्माण करणारे मार्ग तयार करण्याचे ध्येय ठेवत आहोत.”
गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल आयसीएसई अभ्यासक्रमाचे अनुसरण करत असून नर्सरीपासून इयत्ता २ री पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा एक मजबूत पाया तयार करते. शाळा स्थानिक आणि राष्ट्रीय तत्त्वज्ञान, संस्कृती आणि नीतिमत्तेच्या बाबतीत खोलवर रुजलेली असतानाच शिक्षणासाठी जागतिक दृष्टिकोन स्वीकारत आहे. शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट आणि अभ्यासाच्या वर्गाच्या पलीकडे विस्तारलेल्या मूल्यांना मूर्त रूप देणारी चांगली अष्टपैलू व्यक्तीमत्व तयार करणे हे शाळेचे उद्दिष्ट आहे. गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल (राष्ट्रीय शिक्षण धोरण) नॅशनल एज्युकेशन पॉलिसीशी (NEP) सुसंगत असून सर्वांगीण विकासाला चालना देणारे आनंदी शिक्षण वातावरण प्रदान करण्याची त्यांची बांधिलकी आहे.