मुंबई : शिवाजी पार्क मैदानातील श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे २२ ते २७ एप्रिल दरम्यान ५५ व्या वसंतोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर परिसरामध्ये करण्यात आले आहे. उद्घाटन दिनी २२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वा. संगीतकार अभिजित राणे यांच्या संगीताने बहरलेला गीतांचा “सोन साजरी धून” कार्यक्रम होणार असून तत्पूर्वी हळदीकुंकू समारंभ होईल.
२३ एप्रिल रोजी जी.एस.बी.एस.मेडिकल ट्रस्ट सहकार्याने सकाळी ९.०० वा. वैध्यकीय शिबीर तर सायंकाळी ६.३० वा. राहुल देव बर्मन यांनी संगीतबध्द केलेल्या रचनांचा ‘पंचमतंत्र’ कार्यक्रमाचा आविष्कार माधव आजगावकर, लहू पांचाळ, पल्लवी केळकर सादर करणार आहेत. २४ एप्रिल रोजी मराठी विज्ञान परिषद आयोजित खास शालेय विध्यार्थ्यांसाठी ‘विज्ञान खेळणी महोत्सव’ तर सायंकाळी ६.३० वा. नाटककार विध्याधर गोखले जन्मशताब्दी वर्षानिमित्त विध्याधर गोखले प्रतिष्ठान प्रस्तुत ‘जय शं-करा! विध्याधरा!’ कार्यक्रम होईल. २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वा. स्वरनिनाद प्रस्तुत ‘गीत महाभारत’, २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वा. तेंडोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ-झाराप यांचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग ‘पुण्य प्रभाव’ आणि समारोप दिनी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वा. शिळ व गायन यांचा सुरेख संगम असलेला मराठी व हिंदी गीतांचा ‘अनमोल गीत’ कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी निवेदक पुष्कर मुंडले तर ध्वनी संयोजन श्री साउंडचे राजेश दाभोलकर करणार आहेत.