Mumbai/ NHI
जय भवानी स्पोर्ट्स क्लबतर्फे चुनाभट्टी प्रीमियर लीग क्रिकेटचे भव्यदिव्य आयोजन २२ व २३ एप्रिल दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान-चुनाभट्टी येथे होणार आहे. स्पर्धेमध्ये बलाढ्य ८ संघांनी भाग घेतला असून अंतिम विजेत्यांना चषकासह रुपये पंचवीस हजार तर उपविजेत्यांना चषकासह रुपये पंधरा हजार पुरस्कार दिला जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन हिया कंपनीचे डायरेक्टर विमल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
नामवंत क्रिकेटपटूचा सहभाग असलेले चुनाभट्टी रॉयल, चुनाभट्टी टायटन, चुनाभट्टी ब्लास्टर, चुनाभट्टी किंग्ज, चुनाभट्टी पलटण, चुनाभट्टी वॉरीयर्स, चुनाभट्टी टायगर्स, चुनाभट्टी टायगर्स आदी संघामध्ये चुनाभट्टी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी चुरस असेल. त्यामुळे क्रिकेटचा रोमांचक थरार क्रिकेट शौकिनांना पाहण्यास मिळणार आहे. चुनाभट्टी प्रीमियर लीगची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय भवानी स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी व कार्यकर्ते अविरत परिश्रम करीत असल्याची माहिती क्रिकेटपटू व संयोजन समितीचे विशाल पाटील यांनी दिली.