मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात तीन प्रवासी ठार झाले असून दोन प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
Mumbai- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुपारी चारोटी जवळील श्री महालक्ष्मी मंदिर जवळ पुलावर झालेल्या अपघातात तीन प्रवासी ठार तर चार प्रवासी जखमी झाले आहे. विशेष म्हणजे खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली असल्याने राष्ट्रीय महामार्गाची सुरक्षितते बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नालासोपारा पश्चिम येथील राठोड कुटुंबीय भिलाड (गुजरात) येथे जात असताना दुपारी सव्वा वाजल्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरातकडे जाणाऱ्या मार्गीकेवर श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुमारे एक किलोमीटर पुढे रस्त्यावर असलेला एक खड्डाच चुकविताना हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.
गाडीचा चालक दीपक राठोड यांचा अंदाज चुकल्याने पुढे असलेल्या कंटेनर ट्रकला मागच्या बाजूने या कार ने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच मृत्यमुखी पडले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघेजण गंभीर असल्याने त्यांना वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यामध्ये एक वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे.
खड्डा चुकवताना जरा अपघात
राष्ट्रीय महामार्गावर असणारा एक खड्डा चुकवताना या वाहन चालकांनी चुकीच्या बाजूने ओव्हरटेक जाण्याचा प्रयत्न हा अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे.
वाहनातील मृत
१. नरोत्तम छना राठोड (६५)
२. केतन नरोत्तम राठोड (३२)
३. आर्वी दीपेश राठोड (०१)
जखमींची नावे-
१. दीपेश नरोत्तम राठोड (३५)
२. तेजल दीपेश राठोड (३२)
३. मधु नरोत्तम राठोड (५८)
४. स्नेहल दीपेश राठोड (२.५)