अभिनेता पंकज त्रिपाठी स्टारर चित्रपट मैं अटल हूँ चे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. चाहते त्यांच्या या लूकचे खूप कौतुक करत आहेत. पोस्टर पाहून असे वाटत आहे की, पंकज यांना या गेटअपसाठी अनेक तास मेकअपमध्ये घालवावे लागले असतील. मेकअप आणि प्रोस्थेटिक्समधील जाणकारांनी त्यांना या गेटअपमध्ये आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. फर्स्ट लूक समोर आल्यानंतर चाहते अटलजींचा हा लूक पाहण्यासाठी खूप उत्साहित आहेत.
अटलजींच्या भूमिकेविषयी पंकज उत्साही
अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंकज यांनी पोस्ट शेअर करताना लिहिले आहे, ‘कधी डगमगलो नाही, कधी डोके झुकवले नाही, मी एक अनोखे बल आहे, मी अटल आहे.’ – पंडित धीरेंद्र त्रिपाठी
पुढे पंकज यांनी लिहिले आहे, ‘मला संधी मिळाली की, या विलक्षण व्यक्तीमत्वाला पडद्यावर अभिव्यक्त करण्याची संधी मला मिळाली. या क्षणी मी खूप भावूक आणि कृतज्ञ आहे. अटलजींचे व्यक्तीमत्व पडद्यावर साकारण्यासाठी मला संयमासह स्वतःच्या व्यक्तीमत्वावर काम करण्याची गरज आहे. हे मला माहिती आहे. स्फूर्ती आणि मनोबलाच्या आधारे मी नव्या भूमिकेला न्याय देऊ शकेल. मला हा अटल विश्वास आहे. चित्रपट सिनेमागृहांत डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होईल.’
जूनमध्ये झाली होती चित्रपटाची घोषणा
या वर्षीच्या 28 जून रोजीच निर्मात्यांनी बायोपिकची घोषणा केली होती. तेव्हापासूनच चाहत्यांना उत्सुकता होती की चित्रपटात अटल बिहारी वाजपेयींची भूमिका कोण साकारणार? आता यावरून पडदा दूर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव आहे. तर लेखन उत्कर्ष नैथनींनी केले आहे.