मुंबई/ठाणे, २५ डिसेंबर २०२२: ठाण्यातील पसंतीचे आवडते शॉपिंग स्थळ असलेल्या कोरम मॉल मध्ये ख्रिसमस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. उत्सवाची मजा लुटत, आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते.
चमकणारे दिवे, रेनडिअर स्लेज, गोल्ड रिंग्ज, घंटा आणि विविधरंगी लॉलीपॉप्स यांनी ग्रँड ट्री सुशोभित केला होता. खरेदी करताना ग्राहकांसाठी उत्सवी संगीत, गाणी लावण्यात आली होती. सजावट इतकी आकर्षक होती की हजारो लोकांनी उत्सवात सामील होण्यासाठी गर्दी केली होती. ३० फूट ख्रिसमस ट्री हे मुख्य आकर्षण होते. त्यापाशी जाऊन प्रत्येकजण कुटुंब आणि मित्रांसोबत सेल्फी घेत होता. मोठी माणसे आणि लहान मुले दोघांनाही जादुई अनुभव देणारे आणखी एक आकर्षण म्हणजे सांताची भेट आणि अभिवादन. मुलांनी सांतासोबत फोटो काढले आणि त्यांच्या इच्छा सांगितल्या. त्या बदल्यात त्यांना चॉकलेट्स आणि भेटवस्तू मिळण्याव्यतिरिक्त त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. शॉप, प्ले आणि विन यासारख्या उपक्रमांद्वारे ग्राहकांना ख्रिसमसच्या उत्सवात सहभागी होण्यास सांगितले गेले आणि अनेक भाग्यवान ग्राहकांना मॉलमधील सर्वोत्कृष्ट ब्रँड्सकडून सौंदर्यप्रसाधने, वस्तू आणि आकर्षक गिफ्ट व्हाउचर यांसारखी बक्षिसे मिळाली.
मॉलच्या असंख्य स्टोअर्समध्ये विशेष ऑफर आणि सवलतींमुळे ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण झाला. याशिवाय मॉलने त्यांच्या ग्राहकांना मोफत जेवण, पार्किंग, चित्रपटाची तिकिटे आणि कार वॉश देऊन त्यांच्या खरेदीचा आनंददायी अनुभव वाढवला.
कार्यक्रमादरम्यान रिटेलचे उपाध्यक्ष देवा ज्योतुला यांनी सर्वांचा उत्साह पाहून आनंद व्यक्त केला आणि ते म्हणाले, “आम्ही आमच्या वार्षिक ख्रिसमस उत्सवात सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. ख्रिसमसच्या उत्साहात भर घालण्यासाठी भव्य ख्रिसमस ट्री, थीमवर आधारित संगीत, आमच्या किरकोळ विक्रेत्यांकडील विशेष सवलती आणि ऑफर आणि विविध खाद्यपदार्थांच्या पर्यायांमुळे हे ख्रिसमससाठी एक परिपूर्ण गेटवे बनले आहे. ग्राहकांनी जेव्हा लार्जर दॅन लाइफ अशी भव्य ख्रिसमस सजावट पाहिली, आकर्षक गुंतवून ठेवणारे कार्यक्रम पाहिले आणि मुलांना चॉकलेट्स आणि भेटवस्तूंचे वाटप करणाऱ्या सांताक्लॉजची भेट घेतली तेव्हा ख्रिसमसचे सगळे सार तिथे प्रत्यक्ष साकार झाले. खरेदीदारांच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता. ग्राहकांच्या लोकांनी कॅरोल गायले, नृत्य केले आणि जणू ख्रिसमसचे चैतन्य जिवंत केले. हा सणच जो सर्व काही देण्याचा, शेअर करण्याचा आहे हे जाणून कोरमने हा सण विशेष उत्साहाने साजरा केला. आजूबाजूच्या परिसरातील विविध निवासी सोसायट्यांमध्ये जाऊन सांता मुलांना भेटले आणि भेटवस्तूंचे वाटप केले. अशा विशेष आणि अर्थपूर्ण वाटेल अशा प्रकारे कोरमने आनंदाने उत्सव साजरा केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा वेळ खूप आनंदात गेला असेल अशी आम्ही आशा करतो. पुढच्या वर्षी पुन्हा त्यांच्यासोबत सुट्टीचा काळ साजरा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सर्वांना ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.”