विद्यार्थ्यांमधील कलागुणांची जोपासणा होणेे गरजेचे
– मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांचे प्रतिपादन
नाशिक: – सांस्कृतिक वारसा टिकण्यासाठी विद्यार्थ्यांमधील कलागुणांची जोपासणा होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘इंद्रधनुष्य’ 2022 – 2023 विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेच्या समारोप मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास व्यासपीठावर कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, विधी अधिकारी अॅड. संदीप कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, श्री. गौरव तांबे, श्री. प्रसाद गोखले, कु. संज्योती देवरे, श्री. धनंजय जैन, श्री. भूषण कापडणे, श्रीमती श्रेयसी रॉय, श्रीमती नमिता राजहंस, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. बी. आर. पेंढारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर कला, साहित्य व सांस्कृतिक वारसा जपणाÚया कलांची जोपासणा केली पाहिजे. आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा याकरीता विद्यापीठाकडून ‘इंद्रधनुष्याच्या’ माध्यामातून मंच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या संपन्न व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी इंद्रधनुष्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. भविष्यात निर्माण होणारे डॉक्टर्स इंद्रधनुष्य महोत्सवात संगीत, नृत्य, साहित्य कला, नाटय कला, ललीत कला आदी कला प्रकारांचे सादरीकरण करतात. यामधून आलेल्या अनुभवातून त्यांचे कलागुण विकसित होतात. इंद्रधनुष्याच्या मंचावर मिळणारा अनुभव त्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम करणे गरजेचे आहे. इंद्रधनुष्य कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांची मेहनत व कलागुण वाखाणण्याजोगे आहेत. इंद्रधनुष्याच्या निमित्ताने विद्यापीठस्तरावर कला सादर करण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे, या संधीचा चांगला उपयोग त्यांनी करावा. यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. अभ्यासाबरोबरच शिस्त, कलागुणांची जोपासना व सराव कायम ठेवावा असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना परिक्षक श्री. भूषण कापडणे यांनी सांगितले की, कलेची सोबत व्यक्तीमत्वाचा विकास करते. त्यामुळे आयुष्यभर एकतरी कला प्रकाराचा छंद बाळगावा असे त्यांनी संागितले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना परिक्षक कु. संज्योती देवरे यांनी सांगितले की, कोणताही कलाकार संपूर्णतः परिपूर्ण नसतो मात्र प्रत्येकाचा प्रवास त्या दिशेने होणारा पाहिजे. चूका झाल्या तरी आत्मविश्वासाने सादरीकरण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
मा. राज्यपाल कार्यालयामार्फत आदेशित करण्यात आल्यानुसार ’इंद्रधनुष्य’ सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठात तीन दिवस प्राथमिक निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांनी ‘इंद्रधनुष्य’ 2022 – 2023 करीता विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले. विद्यापीठ मुख्यालयातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत विविध कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.
इंद्रधनुष्य प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेच्या संबंधित विषयातील तज्ज्ञ श्रीमती सुमुखी अथनी, श्रीमती शिल्पा देशमुख, श्री. ईश्वर जगताप, श्री. गौरव तांबे, श्री. प्रसाद गोखले, कु. संज्योती देवरे, श्री. धनंजय जैन, श्री. भूषण कापडणे, श्रीमती श्रेयसी रॉय, श्रीमती नमिता राजहंस, श्री. मुरलीधर रोकडे, प्रा. बाळ नगरकर, प्रा. दिपक वर्मा, श्री. अनिल माळी, श्री. रावसाहेब चव्हाण, श्री. अविनाश जाधव, श्रीमती उमा पलोड, श्रीमती राजश्री वर्मा, प्रा. संजय साबळे, श्री. राजू दानी, श्री. अविनाश आडके, श्री. वरुण भोईर, प्रा. नरवाडे, श्री. शिरिष हिंगणे, श्री. राजा पाटेकर, श्री. धनंजय जैन यांनी परिक्षण व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
‘इंद्रधनुष्य’ सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत, नृत्य, साहित्य कला, नाटय कला, ललीत कला आदी पाच मुख्य कला प्रकारांचा समावेश आहे. विद्यापीठस्तरीय इंद्रधनुष्य कार्यक्रमात नाटय कला प्रकारात एकांकिका, विडंबन नाटय, मुकअभिनय, मिमिक्री, ललीत कला प्रकारात जलद चित्रकला स्पर्धा, चिकट चित्र स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, मृदशिल्प स्पर्धा, व्यंगचित्र स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्थळ छायाचित्र आदी कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे समन्वयन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यंानी केले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पियुष पुरोहित यांनी तसेच उपस्थितांचे आभार विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी मानले. ‘इंद्रधनुष्य’ विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेकरीता विद्यापीठातील श्री. सचिन धेंडे, श्री. राजेश इस्ते, श्रीमती रेखा करवल, श्री. विनायक ढोले, श्रीमती प्रतिभा बोडके, श्री. आबाजी शिंदे, श्री. नाना परभणे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक व अभ्यांगत मोठया संख्येने उपस्थित होते.