मुंबई : मुंबईत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. पारस पोरवाल यांनी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल झाले असून, तपास सुरु आहे.
पारस पोरवाल दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी भायखळा येथील आपल्या राहत्या इमारतीच्या 24 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आयुष्य संपवलं. दरम्यान त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती मिळालेली नाही. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट अद्याप सापडलेली नाही.
पोलीस सध्या कुटुंबासह नातेवाईक, मित्रांकडे चौकशी करत असून ते कोणत्या तणावात होते का याची माहिती घेत आहेत. दरम्यान, या आत्महत्येमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बिल्डर पारसभाई पोरवाल यांनी आज सकाळी ७ च्या सुमारास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारसभाई पोरवाल हे काळाचौकी परिसरातील शांतीकमल टॉवरमध्ये राहतात. याच इमारतीच्या २४ व्या माळ्यावरुन उडी घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. पारसभाई पोरवाल यांना आर्थिक अडचण होती त्याच टेन्शनमध्ये असलेल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांकडून पारस पोरवाल यांचा मृतदेह ताब्यात घेण्याचं काम सुरु आहे. त्यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम केल्यानंतर अधिक बाबींचा उलगडा होईल. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी पंचनामा करण्याचं काम सुरु आहे. त्यांच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय. भायखळा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.