~ काम, आहार व व्यायामामध्ये योग्य संतुलन राखण्यावर त्याचा विश्वास आहे ~
कलाकारांसाठी फिटनेस म्हणजे अन्नामध्ये मीठ असल्यासारखे आहे आणि शोबिझमध्ये ते प्रत्येकवेळी तंदुरूस्त, आकर्षक व मोहक दिसणे आवश्यक असते. या गोष्टी साध्य करण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली आवश्यक आहे. सोनी सबवरील मालिका ‘धर्म योद्धा गरूड’मध्ये गरूडची भूमिका साकारणारा अभिनेता फैजल खानने त्याची फिटनेस ध्येये संपादित करण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे. फैजल स्वत:च्या फिटनेसकडे गांभीर्याने लक्ष देतो आणि व्यायामाबाबत कोणतीच तडजोड करत नाही. अत्यंत प्रतिभावान फैजल फिटनेसचे काटेकोरपणे पालन करतो. मन व शरीरासाठी जीवनात आरोग्यदायी निवडी करणाऱ्या फैजल खानचा फिटनेस मंत्र म्हणजे करत असलेल्या कामामध्ये आनंदी राहणे व त्यामध्ये परिपूर्णता आणणे.
व्यायाम नित्यक्रमाबाबत सांगताना अभिनेता म्हणाला, ‘’मालिका ‘धर्म योद्धा गरूड’मधील माझ्या भूमिकेसाठी मला माझ्या शरीरयष्टीवर मेहनत घ्यावी लागली. त्यासाठी मला ८ किलो वजन कमी करावे लागले. मी नित्यक्रम निर्धारित केला आहे. योगा माझ्या फिटनेस नित्यक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मी दररोज सकाळी योगा करतो. याव्यतिरिक्त मी दररोज जिममध्ये व्यायाम करतो. पण सोमवारी व्यायामाच्या ऐवजी नृत्य करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या व्यायाम नित्यक्रमामध्ये स्विमिंग व सायकलिंगचा देखील समावेश आहे.’’
फैजलसाठी जीवनशैली म्हणजे काम, आहार व व्यायाम यामध्ये संतुलन राखणे. अभिनेता अनारोग्यकारक आहार सेवन करत नाही. तो पुढे म्हणाला, ‘’मी लोकांना अनारोग्यकारक आहार टाळण्याचे आवाहन करतो. माझ्या मते व्यक्तीने आवडणारे पदार्थ खावेत, पण प्रमाणात आणि सर्व फॅट दूर करण्यासाठी व्यायाम देखील केला पाहिजे. प्रत्येकाच्या दैनंदिन नित्यक्रमामध्ये व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला तंदुरूस्त व सुदृढ ठेवतो.’’
पहा ‘धर्म योद्धा गरूड’ दर सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त सोनी सबवर