दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण व सकारात्मक होऊन जाते. या खास दिवशी सर्व देशवासी दसरा साजरा करत असताना सोनी सबच्या लोकप्रिय मालिकांमधील प्रेक्षकांचे आवडते कलाकार या सणाच्या साजरीकरणाबाबत सागत आहेत.
मालिका ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये विक्रम सरनची भूमिका साकरणारे आदिश वैद्य म्हणाले, “दसरा नेहमीच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसरा हा महाराष्ट्रात नवीन शुभारंभासाठी आणि नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ काळ मानला जातो. महाराष्ट्रातील आणखी एक प्रचलित प्रथा म्हणजे मित्र आणि कुटुंबियांना आपट्याची पाने देणे. ही पाने सोन्याचे प्रतिनिधित्व करतात. दसऱ्याला आम्ही घरी स्वादिष्ट पदार्थ बनवतो आणि अशा प्रकारे मी दरवर्षी माझ्या कुटुंबासोबत दसरा साजरा करतो. हा सण खूप सकारात्मकता आणि उत्साह घेऊन येतो.’’
मालिका ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये दिप्तीची भूमिका साकारणाऱ्या गरिमा परिहर म्हणाल्या, “या दिवशी आम्ही शूटिंग करत नसल्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबासोबत अधिक वेळ व्यतित करण्यास मिळतो. मला लोक ज्या पद्धतीने रावणाचा पुतळा उभारतात ते खूप आवडते. तसेच मला मेळाव्यांमध्ये जायला आवडते आणि खासकरून रावणाचे मोठे पुतळे पाहायला, लाडू, बदामचा हवा आणि इतर अनेक मिठाई खायला आवडतात.
हा सण दुष्टावर सुष्टाच्या विजयाचे प्रतीक आहे. स्थिती काहीही असो नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करा. माझा चांगले कर्म करण्यावर दृढ विश्वास आहे. जर घाबरायचे असेल तर देवाला घाबरा, जो तुमचे कधीच वाईट करणार नाही. चांगले कर्म करा, तरच तुमचे चांगले होईल. जसे कर्म तसे फळ. दसऱ्याच्या आनंदमय शुभेच्छा!’’
मालिका धर्म योद्धा गरूड’मध्ये भगवान विष्णूची भूमिका साकारणारे विशाल करवाल म्हणाले, ‘’माझ्या दसऱ्याबाबत गोड आठवणी आहे. मी लहान नगरामध्ये राहायचो. आम्ही दरवर्षी उत्साहात व जल्लोषात हा सण साजरा करायचो. मी माझ्या मित्रांना भेटायचो आणि आम्ही रावणाचा पुतळा जळताना पाहण्यासाठी दोन किमी पायी चालत जायचो. बालपणीचे ते दिवस खूपच आनंददायी होते. तसेच अनेक मिष्टान्ने व मिठाई देखील असायच्या, ज्यांचा आम्ही खूप आस्वाद घ्यायचो. माझा विश्वास आहे की, वाईट गोष्टींचा नेहमीच शेवट होतो आणि दुष्टावर सुष्टाचा विजय होतो. हा सण म्हणजे सत्याच्या विजयाचा उत्सव आहे.”
मालिका धर्म योद्धा गरूड’मध्ये कद्रूची भूमिका साकारणाऱ्या पारूल म्हणाल्या, ‘’दसरा सण सर्वांना आठवण करून देतो की, चांगल्याचा नेहमीच वाईट व दुष्टावर विजय होतो. नेहमीच एक आशा असते की न्यायाचा विजय होईल, सर्व वाईट गोष्टी दूर होती आणि चांगल्याचा विजय होईल. माझ्या मते, दसरा सण या विश्वासाचे परिपूर्ण उदाहरण आहे. असे मानले जाते की, या दिवशी श्रीरामांनी राक्षस राजा रावणाचा वध केला आणि अपहरण केलेल्या स्वत:च्या पत्नीची सुटका केली. बालपणी आम्ही एका मंडपामधून दुसऱ्या मंडपामध्ये जायचो आणि सणाचा खूप आनंद घ्यायचो.’’
मालिका ‘वागले की दुनिया’मध्ये राजेशची भूमिका साकारणारे सुमीत राघवन म्हणाले, ‘’दसरा हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. देशभरात हा सण उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. दसरा सणामागील उद्देश अत्यंत प्रबळ आहे आणि त्यामध्ये समकालीन स्थितीबाबतचा मोठा अर्थ आहे. दुष्टावर नेहमीच सुष्टाचा विजय होतो. या सणाचे सार असे आहे की, व्यक्ती जोपर्यंत त्याच्या मूळ नैतिकतेचे व मूल्यांचे पालन करतो तोपर्यंत तो योग्य मार्गावर असतो आणि यावर माझा विश्वास आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात अधिक आनंद, सुख आणि सकारात्मक भावना घेऊन येवो.”
Thanks Regards