मुंबई, सप्टेंबर 09, 2022: अहमदाबाद स्थित हर्षा इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेडने (कंपनी) आपल्या पहिल्या प्राथमिक समभाग विक्रीत प्रति समभाग Rs.314 ते Rs.330 इतकी किंमत निश्चित केली आहे. कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीला (आयपीओ) सप्टेंबर १४, बुधवार रोजी सुरूवात होणार असून त्याची समाप्ती 16 सप्टेंबर, 2022 शुक्रवारी होणार आहे. गुंतवणूकदारांना कमीतकमी 45 समभागांसाठी आणि त्यानंतर 45च्या समभागांच्यापटीत बोली लावता येणार आहे.
सदर प्रस्तावात Rs.455 कोटी पर्यंतच्या नवीन समभागांच्या विक्रीचा समावेश असून सध्याच्या समभागधारकांकडील Rs.300 कोटी पर्यंतचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी प्रस्तावित आहेत.
सदर विक्री बूक बिल्डिंग प्रोसेसद्वारे करण्यात येणार असून यात 50% पर्यंत समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी उपलब्ध असतील, बिगर संस्थात्मक बोलिदारांसाठी कमीतकमी 15% समभाग उपलब्ध असतील आणि कमीतकमी 35% समभाग घाऊक वैयक्तिक बोलिदारांसाठी उपलब्ध असतील.
हर्षा समूहाची स्थापना 1986 मध्ये प्रवर्तक हरिष रंगवाला आणि राजेंद्र शाहा यांनी केली ज्यांच्याकडे प्रिसिजन इंजिनिअरिंग आणि बेअरिंग केजेसच्या उत्पादनाचा 35 पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव आहे. या दोन्हींचा वापर मुख्यत्वे ऑटोमोटीव्ह, रेल्वे, हवाई वाहतूक क्षेत्र तसेच अंतराळ, बांधकाम, खाणकाम, शेती, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, नवीकरणयोग्य ऊर्जा आणि इतर औद्योगिक क्षेत्रात होतो.
कंपनी 20 मीमी ते 2000 मीमी व्यासाचे विविध प्रकारचे बेअरिंग केजेस देऊ करते. वित्तवर्ष 2020 मध्ये भारतीय बेअरिंग केजेसच्या बाजारपेठेच्या संघटित क्षेत्रात कंपनीचा 50-60% तर ब्रास, स्टील आणि पॉलियामाइड पासून निर्मित जागतिक स्तरावरील बेअरिंग केजेसच्या बाजारपेठेच्या संघटित क्षेत्रात 6.5% हिस्सा राहिला आहे. कंपनी कॉंप्लेक्स आणि मागणी नुसार प्रिसिजन स्टॅंप्ड कंपोनंट्स, वेल्डेड असेंब्लिज, ब्रास कास्टिंग्ज व केजेस आणि ब्रॉंझ कास्टिंग आणि बुशिंग्जचेही उत्पादन करते.
याबरोबरच कंपनी जगभरात आणि अंतिम उत्पादन करणार्या उद्योगांसाठी विविध प्रकारच्या प्रिसिजन इंजिनिअरिंग उत्पादनांचे उत्पादन करते. यात बेअरींग केजेस (ब्रास, स्टील आणि पॉलियामाइड पासून निर्मित), कॉंप्लेक्स आणि स्पेशलाइझ्ड प्रिसिजन स्टॅंप्ड कंपोनंट्, वेल्डेड असेंब्ली, ब्रास कास्टिंग आणि केजेस ब्रॉंझ बुशिंग्ज यांचा समावेश होतो. या पलीकडे इपीसी सोलर प्रकारात सोलर फोटोव्होल्टॅइकच्या गरजांची पूर्ताता करणारी उत्पादनेही कंपनी पुरवते.
31 मार्च, 2022 पर्यंत कंपनीने 7,205 बेअरिंग केजेसचे आणि 295 इतर उत्पादनांचे उत्पादन केले आहे. या बरोबरच गेल्या तीन वर्षात कंपनीच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन सेंटरने 1,200 पेक्षा अधिक प्रकराची बेअरिंग्स तयार केली आहेत.
कंपनीची पाच उत्पादन केंद्रे आहेत जी मोक्यांच्या स्थानावर स्थित आहेत ज्यातील चंगोदर आणि मोरीया ही दोन केंद्र अहमदाबाद जवळ स्थित आहेत. तर भारता बाहेर प्रत्येकी एक उत्पादन केंद्र चीन मधील चॅंगशू आणि रोमानियात घिंबॅव ब्रॅसॉव्ह येथे आहे ज्याचा लाभ जागतिक बाजारपेठेत व्यवसाय प्रभावीपणे आणि किफायतशीरपणे करण्यात आणि उत्तर अमेरिका, युरोप, आशिया, दक्षिण अमेरिका आणि अफ्रिका खंडातील 25 देशातील ग्राहकांना सेवा देताना होतो.
हर्षा इंजिनअर्सचा कार्यात्मक महसूल वित्तवर्ष 2021 मधील Rs. 873.75 वरून 51.24% ने वाढून Rs.1321.48 कोटी इतका झाला आहे ज्यात अभियांत्रिकी व्यवसायातून वाढलेले उत्पन्न कारणीभूत आहे. करोत्तर नफ्यातही वित्तवर्ष 2021 मधील Rs.45.44 कोटींच्या तुलनेत वित्तवर्ष 2022 मध्ये 102.35% वाढ होऊन तो Rs.91.94 कोटींवर पोहचला आहे ज्यामागेही अभियांत्रिकी व्यवसायातून वाढलेले उत्पन्न आणि सोलर ओपीसी व्यवसायाच्या तोट्याला घातलेला आळा, विमिमय दरातून झालेला लाभ इ. कारणीभूत आहे.
एक्सिस कॅपिटल लिमिटेड, एक्वायरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि जे.एम. फायनाशिंयल लिमिटेड हे सदर प्रस्तावाचे बूक रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड हे ऑफरचे रजिस्ट्रार आहेत. समभागांची बीएसई आणि एनएसईवर नोंदणी अपेक्षित आहे.