-
नोंदणीला १ सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरू राहिल
-
ई-यंत्र प्रोजेक्टला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून निधी साह्य मिळाले असून आयआयटी मुंबईच्या सीएसई विभागामध्ये आयोजित करण्यात आला आहे
-
आयआयटी मुंबईच्या कम्प्युटर सायन्स विभागामधील प्रा. कवी आर्य ई-यंत्रचे प्रमुख अन्वेषक आहेत
मुंबई, सप्टेंबर, २०२२: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईने सर्वसमावेशक शहरी पायाभूत सुविधांकरिता उपाय शोधण्यासाठी ई-यंत्र इनोव्हेशन चॅलेंज (ईवायआयसी २०२२-२३) सुरू केले आहे. ई-यंत्र प्रोजेक्टला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून निधी साह्य मिळाले आहे आणि आयआयटी मुंबईच्या सीएसई विभागामध्ये हा आयोजित करण्यात आला आहे. शहरी समावेशकता व शेतीला मदत करण्यासाठी शाश्वत व प्रगत तंत्रज्ञान या वर्षाच्या थीम आहेत. येथे सर्वसमावेशकता विकलांग व्यक्तींना (पीडब्ल्यूडी) अनुसरून आहे, जे लोकसंख्येच्या (३० दशलक्ष लोक) जवळपास २.२ टक्के आहेत, पण कमी सर्वसमावेशक शहरी जागांमुळे त्यांना मागे राहावे लागते.
ई-यंत्र हा रोबोटिक्स आउटरीच उपक्रम आहे, जो तंत्रज्ञानाचा वापर करून समस्या सोडवण्यासाठी तरुण अभियंत्यांना मदत करतो. ई-यंत्र प्रोजेक्ट-बेस्ड लर्निंग (पीबीएल) दृष्टिकोन वापरते, जे व्यावहारिक आणि हाताने शिकण्याचा अनुभव प्रदान करून पारंपारिक शिक्षण देते. ई-यंत्रातील तज्ञ मार्गदर्शक तरुण सहभागींची वास्तविक-जगातील समस्या सोडवण्याची क्षमता वाढवतात.
ई-यंत्र इनोव्हेशन चॅलेंज (ईवायआयसी) ही एक अद्वितीय वार्षिक स्पर्धा आहे, जी एमओओसीद्वारे विद्यार्थी टीम्सना वास्तविक-जगातील समस्या सोडवण्याआधी आणि स्टार्टअप तयार करण्याआधी त्यांना महत्त्वपूर्ण कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देते. ही स्पर्धा २०१४ मध्ये सुरू झाली आणि यावर्षी ई-यंत्र इनोव्हेशन चॅलेंजचे ९वे वर्ष आहे. गेल्या काही वर्षांपासून सरासरी २,००० विद्यार्थ्यांनी ई-यंत्रच्या इनोव्हेशन चॅलेंजमध्ये भाग घेतला आहे.
ई-यंत्र प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक आयआयटी मुंबईच्या कम्प्युटर सायन्स विभागामधील प्रा. कवी आर्य म्हणाले, “ई-यंत्र प्रकल्प हा एक अतिशय खास प्रकल्प आहे, जो गेल्या दशकभरापासून आयआयटी मुंबईमध्ये भरभराटीला येत आहे. ई-यंत्र इनोव्हेशन चॅलेंज तरुणांना वास्तविक समस्यांवर काम करण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यास उपाय शोधण्यासाठी एकत्र आणते. बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये असतात, पण कोणत्या समस्या सोडवायच्या किंवा त्या कशा सोडवायच्या हे त्यांना माहीत नसते. त्यासाठी, ई-यंत्र सहभागींना विषयासंबंधीच्या क्षेत्रांवरील सर्वोत्तम शिक्षणात गुंतवून ठेवते, जेथे तज्ञ त्यांना ते सोडवू शकतील अशा संबंधित समस्या स्पष्ट करण्यात मदत करतात. त्यानंतर त्यांना प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते आणि नंतर त्यांचे स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यास शिकण्यासाठी इन्क्यूबेटरमध्ये पिचिंगचे प्रशिक्षण दिले जाते. हे वर्ष आमच्यासाठी सर्वोत्तम आहे, कारण आम्ही सर्वांसाठी अधिक चांगले जीवन निर्माण करण्यासाठी अधिक समावेशी शहरी लिव्हिंग स्पेससह एक चांगले भविष्य घडविण्यात मदत करण्यासाठी तरुणांशी संलग्न झालो आहोत.”
ई-यंत्र इनोव्हेशन चॅलेंज ४ टप्प्यात विभागलेले आहे. स्टेज १ हा एक प्रशिक्षण स्प्रिंट आहे, जो सहभागींना थीमशी परिचित करतो, त्यांना तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षित करतो आणि त्यांना एमओओसी व तज्ञांच्या प्रत्यक्ष सत्रांद्वारे प्रशिक्षणातील समस्या स्पष्ट करण्यात मदत करतो. स्टेज २ हा प्रोटोटाइपिंग स्प्रिंट आहे, जेथे टीम त्यांच्या प्रस्तावित सोल्यूशनचा प्रोटोटाइप तयार करण्यासाठी ई-यंत्र मार्गदर्शनाखाली काम करतात. स्टेज ३ हा एक इनोव्हेशन स्प्रिंट आहे, जेथे ई-यंत्र एका इनक्यूबेटरसाठी पिच विकसित करण्यात मदत करते – येथे, आयआयटी मुंबई इनक्यूबेटर एसआयएनई ही इनक्यूबेटर म्हणून आहे. शेवटचा टप्पा म्हणजे इम्प्लीमेशन स्प्रिंट, जेथे टीम्स ई-यंत्र मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रूफ-ऑफ-कन्सेप्ट (पीओसी) सुधारतात. ई-यंत्र आयआयटी मुंबई येथे अंतिम फेरीसाठी संसाधने, प्रशिक्षण व मार्गदर्शन आणि प्रवास भत्ता व बोर्डिंग/लॉजिंग या सुविधा देखील देते.
यावर्षीची थीम तरुणांना शहरी लोकांसाठी अधिक चांगल्या आणि अधिक समावेशक राहण्याच्या अनुभवाकरिता उपाय शोधण्यासाठी एक व्यासपीठ देते. हवामानातील बदल आणि विकलांग व्यक्तींसाठी (पीडब्ल्यूडी) चांगल्या तरतूदी लक्षात घेते. चॅलेंज विद्यार्थ्यांना विविध संस्था आणि डोमेनमधून बहु-शिस्तबद्ध संघ तयार करण्याची सुविधा देते.
ई-यंत्र इनोव्हेशन चॅलेंज सहभागींना आयआयटी मुंबई इनक्यूबेटर एसआयएनईकडून इनक्यूबेशन समर्थनासह त्यांचे स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी एक व्यासपीठ देते. या प्रकल्पाने नेक्स रोबोटिक्स, निब्रस टेक्नॉलॉजीज (माईन सर्व्हेइंग ड्रोन), ड्रोन ऑटोमेशन (गटार साफ करणारे रोबोट्स) आणि काटोमरन (मोबाइल रोबोट्स) सारख्या स्टार्टअप्सना मदत केली आहे.
यंदा ई-यंत्रने पुढील संस्थांसोबत सहयोग केला आहे:
- डॉईश बँक,
- सोसायटी फॉर इनोव्हेशन अॅण्ड आंत्रेप्रीन्युअरशीप (एसआयएनई, आयआयटी-मुंबई)
- देसाई सेठी स्कूल ऑफ आंत्रेप्रीन्युअरशीप (डीएसएसई, आयआयटी-मुंबई)
- आयआयटी तिरुपती, टेक्नोलॉजी इनोव्हेशन हब, नवाविष्कार,
- इनक्लुसिव्ह दिव्यांगजन आंत्रेप्रीन्युअर असोसिएशन (आयडीईए),
- डिझाइन ब्रिज फाउंडेशन,
- सीएजी सीईपीटी युनिव्हर्सिटी
- जिओस्पॅटिअल इन्फॉर्मेशन सायन्स अॅण्ड इंजीनिअरिंग हब, (जीआयएसई, आयआयटी मुंबई)
यशस्वी कामगिरी करणाऱ्या विजेत्या टीम्सना १ कोटी रूपयांच्या बक्षीसामधून सीड फंडिंग मिळेल. तसेच २५ लाख रूपयांची बक्षीसे देखील आहेत. ई-यंत्रचे मुख्य अन्वेषक प्रा. कवी आर्य यांचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन “ज्ञान उपभोक्ता” ते “ज्ञान निर्माते” असा बदलण्यावर विश्वास आहे. “स्थानिक प्रगतीसाठी विद्यार्थी नवप्रवर्तक” तयार करणे हे चॅलेंजचे उद्दिष्ट आहे.
ई-यंत्र महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थी या तीन प्रमुख भागधारकांसोबतच्या सहभागातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करते. ई-यंत्र उपक्रम विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम आणि नवकल्पना व उद्योजकतेकडे अभिमुख करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षण प्रणालीला पूरक आहेत. अधिक माहितीसाठी ई-यंत्रची वेबसाइट https://eyic.e-yantra.org/ला भेट द्या.