ठळक वैशिष्ट्ये:-
• पब्लिक इश्यू सबस्क्रिप्शनसाठी २२ ऑगस्ट रोजी खुला होईल आणि २४ ऑगस्ट रोजी बंद होईल
• अर्जासाठी किमान लॉट आकार ४,००० शेअर्स आहे; आयपीओ अर्जाची किमान रक्कम रु. १.२ लाख
• इश्यूद्वारे उभारलेला निधी विस्तार योजनांना निधी देण्यासाठी, कंपनीचे व्यावसायिक उपक्रम आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांकरिता खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल
• आर्थिक वर्ष २१-२२ साठी कंपनीकडून रू. ११.४५ कोटी महसूल आणि रू. १.०९ कोटी निव्वळ नफ्याची नोंद
• फिनशोअर मॅनेजमेंट सर्विसेस् लि. इश्यूची प्रमुख व्यवस्थापक आहे
अहमदाबाद, ऑगस्ट १९, २०२२: जयपूरमधील नेच्युरो इंडियाबुल लि. (Naturo Indiabull Ltd) या एफएमसीजी उद्योगामधील उदयोन्मुख कंपनीचा पब्लिक इश्यू सबस्क्रिप्शनसाठी २२ ऑगस्ट रोजी खुला होणार आहे. कंपनीला बीएसई एसएमई एक्स्चेंज व्यासपीठावर तिचा पब्लिक इश्यू लॉन्च करण्यासाठी मान्यता मिळाली. कंपनी तिच्या विस्तार योजना, खेळते भांडवल आवश्यकता व सामान्य कॉर्पोरेट उद्देशांकरिता निधी पुरवठा करण्यासाठी इनिशिएल पब्लिक ऑफरिंगच्या माध्यमातून रू. १०.९२ कोटी निधी उभारण्याचे नियोजन करत आहे. फिनशोअर मॅनेजमेंट सर्विसेस् लि. इश्यूची प्रमुख व्यवस्थापक आहे. पब्लिक इश्यू २४ ऑगस्ट रोजी बंद होईल.
इनिशिएल पब्लिक ऑफरिंगमध्ये प्रति शेअर ३० रूपये किंमतीमध्ये (प्रति इक्विटी शेअर २० रूपयांच्या प्रीमियमसह) १० रूपये दर्शनी किंमत असलेल्या ३६.४ लाख इक्विटी शेअर्सच्या नवीन इश्यूचा समावेश असेल, ज्यांची एकूण किंमत जवळपास रू. १०.९२ कोटी आहे. अर्जासाठी किमान लॉट आकार ४,००० शेअर्स आहे, म्हणजेच प्रतिअर्ज रू. १.२ लाख. आयपीओसाठी रिटेल वितरण ५० टक्के आहे, म्हणजेच १७.२८ लाख शेअर्सचे मूल्य रू. ५.१८ कोटी आहे.
२०१६ मध्ये स्थापना करण्यात आलेली नेच्युरो इंडियाबुल लि. ही फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्सच्या व्यवसायातील एक उदयोन्मुख कंपनी आहे. कंपनीची स्थापना श्री. गौरव जैन आणि श्रीम. ज्योती चौधरी यांनी केली होती. कंपनी सॅनिटरी टॉवेल, सॅनिटरी नॅपकिन्स, हँड सॅनिटायझर आणि इतर हेल्थ किट इत्यादींसह विविध आरोग्य उत्पादने व किट्सच्या व्यापार व्यवसायामध्ये सामील आहे.
या विकासाबाबत बोलताना नेच्युरो इंडियाबुल लि.चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री. गौतम जैन म्हणाले, ”कंपनीच्या विकास धोरणाचा एक भाग म्हणून राजस्थानच्या बाजारपेठेत सखोल प्रवेश करण्याचे आणि इतर क्षेत्रांमध्ये विस्तार करण्याचे उद्दिष्ट असेल. कंपनी नेच्युरो इंडियाबुल लिमिटेडच्या नावाखाली व शैली अंतर्गत ज्यूस, साबण, शॅम्पू, औषधे, गोळ्या इत्यादी विविध आरोग्य व हर्बल उत्पादनांमध्ये देखील आपली वैविध्यपूर्ण उत्पादने आणत आहे. कंपनीने नमुन्यांचे वितरण सुरू केले आहे. आम्हाला आशा आहे की, प्रस्तावित पब्लिक इश्यूनंतर आम्ही सर्व भागधारकांसाठी दर्जेदार उत्पादने सातत्याने वितरीत करता येतील अशा आमच्या विकास धोरणाची अंमलबजावणी करण्यामध्ये यशस्वी होऊ.”
वर्ष २०१८ मध्ये कंपनीने आपल्या व्यवसायात विविधता आणली आणि ज्यूस, साबण, शॅम्पू, औषधे, गोळ्या इत्यादींसह विविध आरोग्य व हर्बल उत्पादनांच्या विक्रीच्या व्यवसायात प्रवेश केला. आर्थिक वर्ष २१-२२ साठी कंपनीने महसूलात रू. ११.४५ कोटी, ईबीआयटीडीए रु. १.५० कोटी आणि निव्वळ नफा रु. १.०९ कोटीची नोंद केली. कंपनीमध्ये प्रमोटर ग्रुप होल्डिंग सध्या ४२.१७ टक्के आहे.
इश्यूनंतर कंपनीमध्ये प्रमोटर ग्रुप होल्डिंग २७.१२ टक्के असेल. कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई व्यासपीठावर सूचीबद्ध केले जातील. इश्यूनंतर कंपनीचे शेअर भांडवल रु. १०.१९ पर्यंत वाढेल, ज्यामध्ये १० रूपये दर्शनी किंमतीच्या १.०१ कोटी शेअर्सचा समावेश असेल. इश्यूनंतर कंपनीचे नेट वर्थ आणि रिझर्व्ह्स अनुक्रमे रु. २२.९८ कोटी व रु. १२.७८ कोटी होतील. ३१ मार्च २०२२ रोजी प्रति शेअर बुक मूल्य रु. १९.३० आहे.