मुंबई २२ ऑगस्ट, २०२२ – श्री केशव सिमेंट अँड इन्फ्रा लिमिटेड (BSE – 530977) ही कर्नाटक राज्यात सिमेंट आणि सौर उर्जा निर्मिती आणि वितरण करणारी अग्रगण्य कंपनी असून कंपनीने आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीसाठी त्यांचे अलेखापरिक्षीत केलेले आर्थिक परिणाम जाहीर केले आहेत.
प्रमुख ठळक मुद्दे:
- चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी एकूण महसूल ३३.३० कोटी रुपये
- चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी ईबिटा (EBITDA) ९.३७ कोटी रुपये
- चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील करपश्चात नफा (PAT) २६.४५ कोटी
- सिमेंट व्यवसायाच्या माध्यमातून २४.७१ कोटी रुपये ( २३.२४ कोटी रुपये) तर सौर ऊर्जा व्यवसायाच्या माध्यमातून ५.६७ कोटी रुपये (१.६२ कोटी रुपये) योगदान दिले.
या कामगिरीवर भाष्य करताना श्री केशव सिमेंट अँड इन्फ्रा लिमिटेडचे अध्यक्ष श्री व्यंकटेश कटवा म्हणाले की, “आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत सिमेंटची मागणी मोठ्या प्रमाणात होती. त्याच प्रमाणे आर्थिक वर्ष २३ आणि त्यापुढील काळात मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पायाभूत सुविधांवरील खर्च आणि बांधकाम क्षेत्राचा विस्तार हा आगामी काळात मागणी वाढवणारा असेल.
सिमेंटची सरासरी विक्री किंमत आणि विक्री अनुक्रमे २ टक्के आणि ७ टक्क्यांनी वाढली आहे तर अक्षय ऊर्जेची सरासरी प्राप्ती आणि विक्री अनुक्रमे ८ टक्के आणि २४५ टक्क्यांनी वाढली आहे.
१२ मेगा वॉट पॉवरची अतिरिक्त क्षमता वाढल्यापासून सौरऊर्जा व्यवसायात वाढ झाली आहे या प्रमुख कारणामुळे ईबिटामध्ये (EBIDTA) योगदान मिळाले आहेत.”