मुंबई, : पेमेट इंडिया लिमिटेड (“पेमेट”), एक अग्रणी B2B पेमेंट आणि सेवा प्रदाता आहेत जे पुरवठा साखळ्यांमध्ये ; बिझनेस-टू-बिझनेस (B2B) पेमेंट डिजिटाइज, ऑटोमेटिक आणि स्ट्रीमलाइन करतात त्यांनी त्यांच्या प्रस्तावित केलेल्या IPO साठी अलिकडेच फाइल केलेल्या ड्राफ्ट रेड हेरींग प्रॉस्पेक्ट्समध्ये निवेदन केले आहे की कंपनीने पेमेट मोबाइल ऍप्लिकेशन (“पेमेट ऍप”) ऍन्ड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटींग सिस्टीम्सवर लॉन्च केले आहे.
पेमेट ऍपद्वारे, व्यावसायिक त्यांची कमर्शियल क्रेडिट कार्डे वापरून त्यांच्या व्हेन्डोरच्या बँक अकाउंटमध्ये पेमेंट देऊ शकतील. 31 डिसेंबर, 2021 पर्यंत पेमेट ऍप 113,946 वेळा डाऊनलोड केले गेले आहे आणि त्यावर 47,203 व्यवसायांची नोंदणी झाली आहे.
अतिरिक्तपणे, पेमेट ऍपमध्ये कमर्शियल क्रेडिट कार्डे वापरून व्हेन्डोरच्या पेमेंटसह माल व सेवा कराची (GST) पेमेंट देखील भरण्याची सक्षमता आहे. सामान्यतः, GST संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी देय असतो, आणि अनेक कॉर्पोरेट व SMEकडे वेगवेगळे प्रदेश किंवा राज्यांनुसार विकेंद्रीकृत प्रणाली उपलब्ध असते. ही प्रक्रिया पेमेट ऍप वापरकर्त्यांसाठी स्ट्रीमलाइन्ड केलेली आहे जसे ते चालान जनरेट करू शकतात आणि त्यांचा GSTIN नंबर प्रविष्ट करून त्यांची GST पेमेंट भरू शकतात, ज्यामुळे सिस्टीम आपोआप त्यांचा व्यवसाय संबंधित डेटा ऍपवर आणते आणि कमर्शियल क्रेडिट कार्डांद्वारे पेमेंट केले जाते. पेमेट ऍप वापरकर्त्याला SMS आणि व्हॉट्सऍप मेसेज पाठवून त्यांच्या देय तारखेआधी त्यांचे GST भरण्याविषयी सूचना देते.
याविषयी बोलताना, अजय अदिशेषन, मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन, पेमेट, म्हणाले, “पेमेट ऍप आमच्या ग्राहकांना कमर्शियल क्रेडिट कार्डे वापरून त्यांच्या व्हेन्डोरची पेमेंट आणि GST पेमेंट भरण्यात मदत करते जे पारंपारिकपणे कॉर्पोरेट आणि SMEद्वारे NEFT/RTGS वापरून केले जात असे. अतिरिक्तपणे, आमचे आर्थिक संस्था भागीदार आणि भारत सरकारच्या GST पोर्टलसह आमच्या एकीकरणांद्वारे; आम्ही असा सर्वात पहिला B2B पेमेंटचा उपाय देणारा प्रदाता आहोत जे आमच्या ग्राहकांना कमर्शियल क्रेडिट कार्डे एक पेमेंट साधन म्हणून वापरण्याचे प्रस्तावित करतात. यामुळे पेमेटच्या ग्राहकांना 45 दिवसांपर्यंत , विस्तारित आणि कोलॅटरल-फ्री क्रेडिट लिमिट वापरू शकण्याचा फायदा मिळतो ज्यामुळे त्यांना वेळेवर पेमेंट करण्यात मदत होते.
आर्थिक वर्ष 2021मध्ये पेमेटने ₹40,196.68 दशलक्ष रकमेच्या GST पेमेंटवर प्रक्रिया केली, जे त्यांच्या B2B पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक वर्ष 2021 मधील एकूण B2B पेमेंटच्या 18% इतके आहे. त्यापाठोपाठ, एप्रिल ते डिसेंबर 2021 मध्ये पेमेटने कमर्शियल क्रेडिट कार्डांद्वारे ₹99,929.67 दशलक्ष रकमेच्या GST पेमेंटवर प्रक्रिया केली, आणि एकूण मिळून कमर्शियल क्रेडिट कार्ड-प्रक्रियाचा TPV आर्थिक वर्ष 2021 मध्ये ₹187,142.31 दशलक्षांपासून ते ₹464,766.45 दशलक्षांपर्यंत वाढला आहे. 31 डिसेंबर, 2021पर्यंत पेमेट प्लॅटफॉर्म वापरणारे ग्राहक आणि वापरकर्त्यांची एकूण संख्या 166,811 झाली आहे.”
पेमेटचे व्हीसा सोबत भागीदारीमध्ये सेंट्रल युरोपचे इतर भाग, मिडल इस्ट आणि आफ्रिका (“CEMEA”) प्रदेशामध्ये देखील विस्तार करण्याचे लक्ष्य आहे. त्यांचे व्हीसासह नाते आहे, ज्याला अनुसरून व्हीसा आर्थिक संस्था भागीदारी जारी करून पेमेट टू व्हीसाचा परिचय करून देण्याची सुविधा देत आहे, आणि पेमेट सुनिश्चिती करेल की पेमेटच्या सिस्टीमद्वारे प्रक्रिया केलेली कमर्शियल क्रेडिट कार्डे व्हीसासह सहमत असलेल्या काही विशिष्ट आंतरराष्ट्रीय प्रदेशांसाठी व्हीसा कार्डे असतील. पेमेट प्लॅटफॉर्म UAEमध्ये सुरू झालेला आहे आणि त्या प्रदेशामध्ये तो एक व्हीसा-प्रमाणित बिझनेस पेमेंट सोल्यूशन प्रोव्हायडर (BPSP) आहे.