IPO AND MARKET NEWS

लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्याला आनंद महिंद्रा देणार एक्सक्लुझिव्ह एडिशन XUV400

·         एक्सक्लुझिव्ह एडिशन XUV400 चे पहिल्यांदा या वर्षी नोव्हेंबरमध्ये अनावरण करण्यात आले होते ·         याचे डिझाइन अगदी बारीकसारीक तपशीलवार आणि टेलर-मेड घटकांसह असून महिंद्राचे मुख्य डिझाइन अधिकारी प्रताप बोस आणि पुरस्कार विजेते फॅशन डिझायनर रिमझिम दादू यांच्यातील हा सर्जनशील सहयोग आहे. ·         लिलाव विजेत्याला २८ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर केलेल्या महिंद्रा राइज सस्टेनेबिलिटी चॅम्पियन अवॉर्ड्स विजेत्यांना पाठिंबा देण्यासाठी आपली बोली दान करण्याचा आणि/किंवा त्याच्या/तिच्या पसंतीच्या विना नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थेला देण्याचा पर्याय आहे.  ·         जिंकलेल्या बोलीएवढी रक्कम महिंद्रातर्फेही घालून ती रक्कम महिंद्रा राइज सस्टेनेबिलिटी चॅम्पियनच्या विजेत्यांमध्ये त्यांना पाठबळ देण्यासाठी आणि/किंवा विना नफा तत्वावरील गोष्टींना समर्थन देण्यासाठी वितरीत केली जाईल. ·         लिलावाची नोंदणी https://auction.carandbike.com/  वर आधीच खुली आहे. ·         लिलावाला २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात होईल आणि ३१ जानेवारी २०२३  रोजी रात्री ११:५९ ला संपेल ·         १० फेब्रुवारी २०२३ रोजी हैदराबाद येथे फॉर्म्युला ई वीकेंड दरम्यान खास महिंद्रा इव्हेंटमध्ये एकमेवाद्वितीय XUV400 सुपूर्द केली जाईल. मुंबई, २० जानेवारी २०२३: भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक महिंद्रा अँड महिंद्राने एकमेवाद्वितीय एक्सक्लुझिव्ह एडिशन ऑल इलेक्ट्रिक XUV400 च्या विशेष आवृत्तीच्या लिलावाची घोषणा केली. सर्वोच्च बोलीतून मिळालेली रक्कम सामाजिक कारणासाठी दिली जाईल आणि स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा, ग्रीन मोबिलिटी आणि स्वच्छ पाण्यासाठी महिंद्र सस्टेनेबिलिटी पुरस्कार विजेत्यांना वितरित केली जाईल. १० फेब्रुवारी २०२३ रोजी महिंद्रा समूहाचे अध्यक्ष श्री. आनंद महिंद्रा यांच्याकडून विजेत्या बोलीदाराला एसयूव्ही सुपूर्द केली जाईल. महिंद्राचे मुख्य डिझाईन अधिकारी प्रताप बोस यांनी तरुण, क्रांतिकारी फॅशन डिझायनर रिमझिम दादू यांच्या सहकार्याने डिझाइन केलेली ही विशेष आवृत्ती २८ नोव्हेंबर २०२२ रोजी महिंद्रा टेक फॅशन टूरमध्ये प्रथम प्रदर्शित केली गेली. विजेत्याला ११ फेब्रुवारी २०२३ रोजी हैदराबादमध्ये होणाऱ्या ऑल इलेक्ट्रिक FIA फॉर्म्युला ई चॅम्पियनशिपच्या भारताच्या उद्घाटन फेरीचे साक्षीदार होण्यासाठी एक विशेष पास देखील मिळेल. विजेत्या बोलीदाराला २८ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर झालेल्या महिंद्रा राइज सस्टेनेबिलिटी चॅम्पियन अवॉर्ड्स विजेत्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याची/तिची बोली दान करण्याचा आणि/किंवा त्याच्या/तिच्या पसंतीच्या विना नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थेला देण्याचा पर्याय आहे. जिंकलेल्या बोलीएवढी रक्कम महिंद्रातर्फेही घालून ती रक्कम महिंद्रा राइज सस्टेनेबिलिटी चॅम्पियनच्या विजेत्यांमध्ये त्यांना पाठबळ देण्यासाठी आणि/किंवा विना नफा तत्वावरील गोष्टींना समर्थन देण्यासाठी वितरीत केली जाईल. ही ऑल-इलेक्ट्रिक XUV400 म्हणजे महिंद्राच्या हार्टकोर डिझाईन तत्त्वज्ञानासह अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दादूच्या सिग्नेचर स्टाईलचे आखीव रेखीव लालित्य यांचे मिश्रण आहे. रिमझिम दादू डॅझल ब्लू बॉडी कलरमध्ये अल्टा-प्रीमियम कॉपर ब्रॅंडिंग घटक, डयूअल टोन कॉपर रुफ आणि पियानो ब्लॅक मिश्र धातु चाके आहेत. रिमझिम दादू x बोस लोगोचे एक अत्याधुनिक प्रस्तुतीकरण एसयूव्हीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी काळजीपूर्वक निवडलेल्या भागात केले आहे. ही क्षेत्र निवड कॉपर ट्रिम घटकांना आणि एसयूव्हीच्या सुंदर ड्युअल-टोन छत यांना पूरक आहे. तुम्ही आत जाताच, तुम्हाला आलिशान डिझाईन केलेल्या लेदर सीट्स दिसतील, ज्यामध्ये नाजुकपणे रिमझिम दादू निळ्या रंगाची एम्ब्रॉडरी केलेली आहे. तुम्ही दुसऱ्या रांगेतील सीट आर्मरेस्ट खाली केल्यावर ही डिझाईन स्पेस आणखी उलगडते, तिथे प्रीमियम लेथरेट मटेरिअलवर डौलाने बसवलेल्या सूक्ष्मपणे तयार केलेल्या लोगोच्या तपशीलाने तुम्ही मोहित व्हाल. डिझायनर जोडीने कुशन, सीट बेल्ट कव्हर, कीहोल्डर, कॅरी-विथ यू पाऊच आणि दररोज वापरल्या जाणार्‍या प्रीमियम डफल बॅग यांसारख्या अॅक्सेसरीजचीही कल्पना केली असून हे सर्व रिमझिमच्या खास मेटॅलिक फॅब्रिक मटेरियलमध्ये ट्रिम केलेले आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य डिझाईन अधिकारी प्रताप बोस म्हणाले, "XUV400 ही वेगवान, आनंददायी आणि भविष्याचा विचार करून बनवलेली आहे. आमच्या ग्राहकांच्या मनाला, हृदयाला भावणारी, आकर्षित करणारी उत्पादने तयार करणे हे महिंद्राच्या डिझाईनचे सूत्र आहे आणि आम्ही त्याला HEARTCORE DESIGN म्हणतो. हे म्हणजे अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी कार डिझाइनची भावना आणि आमच्या उत्पादनांची कणखरता एकत्र करणे आहे. आम्ही

Read more

मुंबई ऑन्कोकेअर सेंटर ने टाटा कॅपिटल हेल्थकेअर फंड मार्फत पहिल्या टप्प्यात उभारला १० दशलक्ष डॉलर्स इतका निधी!

  मुंबई, साखळीस्वरूप कँसर डेकेअर संस्था म्हणून ख्याती असणाऱ्या आणि सेलक्युअर कँसर सेंटर प्रा. लि . यांचा ब्रँड असणाऱ्या मुंबई...

Read more

युनियन बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने आज 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी बँकेच्या खात्यांना मंजुरी दिली

Q3 FY2023 ठळक मुद्दे 1. मजबूत आर्थिक कामगिरी: आर्थिक वर्ष 2023 च्या तिसर्‍या तिमाहीत, बँकेच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 106.81%...

Read more

भारतीय औषध उद्योगात निर्यातीची अफाट क्षमता – केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

फार्मा क्लस्टरसाठी नागपुरातील मिहान विशेष आर्थिक क्षेत्र उत्तम पर्याय – नितीन गडकरी 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल कॉंग्रेसचे नागपुरात उद्घाटन नागपूर...

Read more

जी-20 देशांनी घेतलेल्या निर्णयांना जागतिक पातळीवर महत्व! विकसनशील राष्ट्रांना मोठा फायदा

जी २० ही केवळ २० देशांची संघटना नसून जागतिक पातळीवरील १३ महत्वाच्या संघटना सुद्धा जी२० च्या सदस्य असल्यामुळे या परिषदेने...

Read more

Paytm ने तिकीट भागीदार म्हणून इलेक्ट्रिक मोबिलिटी सह NueGo सह ग्रीनर इंटरसिटी बस प्रवास सक्षम केला

● दिल्ली-चंदीगड, दिल्ली-जयपूर आणि इंदूर-भोपाळ दरम्यान NueGo इलेक्ट्रिक बससाठी अखंड आणि सोयीस्कर बुकिंग अनुभव सक्षम करते ● 2,500 बस ऑपरेटरमधील...

Read more

14 वी जागतिक मसाले परिषद, येत्या 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होणार

ही परिषद, भारतीय मसाले उद्योगांना जी20 सदस्य देशांबरोबर नवनवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी उपयुक्त ठरेल     मुंबई, 10...

Read more

आर्थिक समावेशावरील कार्यगटाची पहिली बैठक सुरू

कोलकाता, भारताच्या अध्यक्षतेखाली G20 फायनान्स ट्रॅकच्या 'ग्लोबल पार्टनरशिप फॉर फायनान्शियल इन्क्लुजन' (GPFI) कार्यगटाची पहिली बैठक सोमवारी कोलकाता येथे झाली. विश्व-बांगला...

Read more

5G सर्विस येताच 4G नेटवर्क यूजर्सच्या कॉल ड्रॉपमध्ये वाढ, खराब इंटरनेट मिळू लागले

5G Network भारतात वेगाने पसरवले जात आहे. Reliance Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्या दररोज देशातील कोणत्या ना कोणत्या शहरात...

Read more
Page 6 of 12 1 5 6 7 12
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News