मुंबई, साखळीस्वरूप कँसर डेकेअर संस्था म्हणून ख्याती असणाऱ्या आणि सेलक्युअर कँसर सेंटर प्रा. लि . यांचा ब्रँड असणाऱ्या मुंबई ऑन्कोकेअर सेंटर ने टाटा कॅपिटल हेल्थकेअर फंडच्या मार्फत तब्बल १० दशलक्ष डॉलर्स इतका निधी भागभांडवल स्वरूपात उभारल्याची घोषणा केली . भागभांडवलाच्या टक्केवारीचा खुलासा केलेला नाही . नव्याने मिळालेल्या या भांडवलाचा उपयोग मुंबई ऑन्कोकेअर हे पुढील १८ महिन्याच्या कालावधीत आपल्या व्यावसायिक विस्तारासाठी करणार आहे असे सांगण्यात आले.
२०१८ साली कर्करोग तज्ञ , डॉ , आशीष जोशी,डॉ वशिष्ठ मणियार , डॉ क्षितिज जोशी आणि डॉ प्रीतम कळसकर आणि त्यांचे १५ सहकारी कर्करोगतज्ञ यांनी मिळून स्थापन केलेली मुंबई ऑन्कोकेअर हि एक अग्रगण्य कँसर डे -केअर संस्था महाराष्ट्रभर तसेच मध्यप्रदेशात १० शहरांमध्ये १६ ठिकाणी कार्यरत आहे. नमूद भागीदारीबद्दलचा तपशील देताना मुंबई ऑन्कोकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनीष जोबानपुत्र म्हणाले; टाटा समुहासारख्या प्रतिष्ठित उद्योगसमूहाचा भाग असणाऱ्या टाटा कॅपिटलशी भांडवली स्वरूपाची भागीदारी करता येणं हि आमच्यासाठी मोलाची बाब आहे.
टाटा कॅपिटल हेल्थकेअर फंडचे मुख्य प्रतिनिधी श्री वामेश चोवाटीया म्हणाले ; मुंबई ऑन्कोकेअरचा आमच्या हेल्थकेअर आणि लाइफ सायन्स पोर्टफोलिओमध्ये समावेश होणे हा एक महत्वाचा आणि प्रगतिशील टप्पा आहे. कर्करोग उपचार क्षेत्रातील अपूर्ण गरजांची दाखल घेऊन त्यांचं समाधान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि मुंबई ऑन्कोकेअरसारख्या मेडिकल ऑन्कोलॉजी या उपचारप्रणालीवर प्रभुत्व असणारा भागीदार आमच्या सोबतीला असण्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. उच्च दर्जाचे उपचार , वाजवी दारात उपलब्ध करून देण्याच्या मुंबई ऑन्कोकेअरच्या तत्वाशी आम्ही सहमत आहोत आणि अशा तत्वनिष्ठ आणि नफा केंद्रित संस्थेला योग्य वित्तपुरवठा करणे हा आमचा हेतू आहे.
भारतात दरवर्षी कर्करोगाच्या सुमारे १५ लाख रुग्णांचे निदान होते आणि साधारणतः २५-३० लाख रुग्ण हे कोणत्याही स्वरूपाचे उपचार घेत असतात . यापैकी बऱ्याचशा रुग्णांना केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी सारखे उपचार घेणे आणि त्याकरिता ‘ मेडिकल ऑन्कोलॉजी ‘ या उपचारप्रणाली तज्ञांचा सल्ला घेण्याची गरज लागते. मुंबई ऑन्कोकेअरची अद्वितीय कँसर डे -केअर प्रणाली या गरजांची तत्पर पूर्तता करण्यास समर्थ ठरते. मुंबई ऑन्कोकेअरच्या परिपूर्ण इस्पितळांमध्ये कर्करोगग्रस्तांना उच्च दर्जाचे आणि वैयक्तिकृत ( personalized) उपचार मिळतात . मुंबई ऑन्कोकेअर हे ‘ तंत्रज्ञान ‘ , ‘ क्लिनिकल रिसर्च’ आणि ‘ ट्युमर बोर्ड ‘ अशा महत्वाच्या संसाधनांचा वापर करून रुग्णांना अद्ययावत आणि ‘ ‘ एव्हिडन्स – बेसड ‘ उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते .