मुंबई, जानेवारी, २०२३ – ॲवरो इंडिया लिमिटेड (NSE – AVROIND आणि BSE – 543512) ही प्लास्टिक मोल्डेड फर्निचर उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी असून कंपनीला १९ जानेवारी २०२३ रोजी गुडगाव येथे आयोजित एक्सचेंज4मीडिया एजन्सीद्वारे आयोजित “प्राइड ऑफ इंडिया अवॉर्ड, २०२३” ने सन्मानित करण्यात आले आहे.
प्लॅस्टिक फर्निचर श्रेणीतील उत्तर भारतातील सर्वोत्कृष्ट ब्रँड म्हणून संघटनात्मक पद्धतीने वाढणाऱ्या आणि नवीन भारतातील अर्थव्यवस्थेत विकसित होणाऱ्या कंपनीला हा सन्मान देण्यात आला आहे. ॲवरो इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री साहिल अग्रवाल यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला.
या प्रसंगी भाष्य करताना श्री साहिल अग्रवाल म्हणाले की, “प्राइड ऑफ इंडिया अवॉर्ड, २०२३ मिळणे हा एक मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार आम्हाला भविष्यात अधिक दर्जेदार सेवा देणे आणि मेक इन इंडियाचा एक भाग म्हणून पुढे नेत राहील.”