नवीन समभागांच्या विक्रीतून उभारलेला निधी हा नवीन खरेदीदार आणि पुरवठादार यांना जोडणाऱ्या मंचाच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी करण्याचा प्रस्ताव आहे.
मुंबई : सहल आयोजन क्षेत्रातील तंत्रसमर्थ मंच असलेल्या टीबीओ टेकची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या बुधवार, 08 मे, 2024 रोजी इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी बोली उघडेल. ऑफर शुक्रवार 10 मे, 2024 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख मंगळवार 07 मे 2024 रोजी असेल.
यासाठी कंपनीने ८७५ रुपये ते ९५० रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून या माध्यमातून १,५५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे.आयपीओच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करण्यात येणार आहे. तर प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांकडील सुमारे १.२५ कोटी समभागांची विक्री करण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांना किमान १६ समभाग आणि १६ समभागांच्या पटीत समभागांसाठी अर्ज करावा लागेल.
ऑफरमध्ये ₹ 4,000.00 दशलक्ष [₹ 400.00 कोटी] (“फ्रेश इश्यू”) च्या इक्विटी शेअर्सच्या नवीन इश्यूचा आणि 12,508,797 इक्विटी शेअर्सच्या ठराविक भागधारकांद्वारे विक्रीची ऑफर (“विक्रीची ऑफर”, आणि एकत्रितपणे) यांचा समावेश आहे.
नवीन समभागांच्या विक्रीतून उभारलेला निधी हा नवीन खरेदीदार आणि पुरवठादार यांना जोडणाऱ्या मंचाच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये कंपनीच्या विदा (डेटा सोल्युशन्स) आणि तंत्रज्ञानाशी संबंधित गुंतवणुकीसाठी १३५ कोटी आणि ऑनबोर्डिंग प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांसाठी टेक ट्रॅव्हल्स डीएमसीसी या उपकंपनीमधील गुंतवणुकीसाठी १०० कोटींचा समावेश असेल. प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांमध्ये गौरव भटनागर २०.३३ लाख समभाग, मनीष धिंग्रा ५.७२ लाख समभाग, एलएपी ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेडचे २६.०६ लाख शेअर विक्री करणार आहे. टीबीओ टेक ही एक आघाडीची प्रवासी वितरण तंत्रज्ञान मंच आहे आणि ३० जून २०२३ पर्यंत १०० हून अधिक देशांमधील खरेदीदार आणि पुरवठादारांना सेवा प्रदान करते.