मुंबई, मे २०,२०२४: पर्याय उपलब्ध करून देणे आणि डिलर्सला आर्थिकतेमध्ये सहजता मिळावी या उद्देश्याने, टाटा मोटर्स पॅसेन्जर वेहिकल (टीएमपीव्ही) आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (टीपीईएम)- टाटा मोटर्सचा दोन सबसिडरीज आणि भारतातील अग्रगण्य वाहन उत्पादनकर्त्या कंपन्यांनी भारतातीलच एका विविध आर्थिक समूह असलेल्या बजाज फ़िन्सर्व लिमिटेड चा भाग असलेल्या बजाज फ़ायनान्स हात मिळवणी केली आहे, जेणे करून प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन डिलर्सलकरिता वाहन पुरवठा सोपा जावा याकरिता आर्थिक उपाययोजना उपलब्ध होऊ शकतील. या मेमोरॅन्डम ऑफ़ अन्डर्सटॅन्डिंग (एमओयु), मुळे सहभागी कंपन्या एकत्र येतील आणि टीएमपीव्ही अणि टीपीईएमचा डिलर्सला बजाज फ़ायनान्सचा मदतीने किमान अप्रत्यक्ष फ़ंडिंग उपलब्ध होऊ शकेल.
या भागीदारीसाठीचा एमओयु हा टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे प्रमुख आर्थिकता अधिकारी आणि टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्स लिमिटेडचे संचालक, श्री. धिमन गुप्ता आणि बजाज फ़ायनान्स लिमिटेडचे, प्रमुख व्यवसायिक अधिकारी श्री. सिद्धार्थ भट यांच्याद्वारे स्वाक्षरी केला गेला.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे, प्रमुख आर्थिकता अधिकारी आणि टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्स लिमिटेडचे संचालक असलेले श्री. धिमन गुप्ता, या भागीदारीविषयी बोलताना म्हणाले, “ आमचा व्यवसायामध्ये आमचे डिलर्स एक महत्वाचा घटक आहेत आणि आम्हाला सक्रिय पद्धतीने त्यांच्या करता उपाययोजना सादर करून त्यांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये सहजता यावी याकरिता प्रयत्न करण्यास अतीशय आनंद होतो. एकत्रितपणे, आम्ही बाजारात विकसित होण्याचा हेतू घेऊन पुढे जातो आणि ग्राहकांचा वाढत्या मागणीनुसार नवीन फ़ॉरएव्हर पोर्टफ़ोलियो त्यांना देतो. आणि हे साध्य करण्याकरिता, आम्हाला बजाज फ़ायनान्सशी भागीदारीकरून आर्थिकता उपयायोजना राबविण्यात एक उत्तम संधी मिळते आहे, ज्यामुळे आमचे डिलर भागीदारांशी असलेले नाते अधिक मजबूत होईल आणि त्यांना कामाकरिता अधिक आर्थिक मदत मिळेल.”
या भागीदारी विषयी बोलताना, बजाज फ़ायनान्स लिमिटेडचे, उप–महासंचालक , श्री. अनुप साहा म्हणाले, “ बजाज फ़ायनान्स, भारतीय आर्थिक उपाययोजनांचा वापर करून उत्तम अशा आर्थिक प्रक्रिया उपलब्ध करून देते, ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यवसायिक सबळीकरण होऊ शकेल. आपल्या या आर्थिक उपक्रमाचा माध्यमाने, आम्ही टीएमपीव्ही आणि टीपीईएमचा अधिकृत प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन डिलर्सला आर्थिक मदत करणार आहोत, ज्यामुळे त्यांना प्रवासी वाहन बाजारामध्ये विकसित होण्याचा संधींचा योग्य तो मार्ग अवलंबता येऊ शकेल. आम्हाला खात्री आहे की या एकीकरणामुळे फ़क्त डिलर्सलाच फ़ायदा होणार नाहीये तर एकूणच भारतातील वाहन उद्योगाला मदत मिळणार आहे.”
टीएमपीव्ही आणि टीपीईएमने भारतील वाहन बाजारपेठेमध्ये आपल्या आयसीई आणि ईव्ही विभागांमध्ये सातत्याने प्रयत्नकरून आपले असे एक स्थान निर्माण केले आहे. कंपनीचा कायमस्वरूपी नवीन या तत्वाचा विचार करून अग्रगण्य उत्पादनांची श्रेणी सादर केली आहे, ज्यांना ग्राहकांनी देखील चांगली पसंती दर्शविली आहे.