राष्ट्रीय, २० मे २०२४NHI NEWS AGENCY
: ऑक्सफोर्ड इंग्लिश लँग्वेज लेव्हल टेस्ट (ऑक्सफोर्ड ईएलएलटी) या ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल एज्युकेशन ग्रुपचा भाग असलेल्या आघाडीच्या इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग प्रदाताने आज जगभरातील ३० हून अधिक युनिव्हर्सिटी सहयोगींना ऑनबोर्ड केल्याची घोषणा केली. विस्तारीत नेटवर्कमध्ये आता प्रख्यात संस्थांचा समावेश आहे, जसे यूकेमधील रसेल ग्रुपची प्रमुख सदस्य युनिव्हर्सिटी ऑफ एडनबर्ग आणि टॉप-रँकिंग युनिव्हर्सिटीज जसे वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी. या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीजसह यूकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ एडनबर्ग आणि यूएसएमधील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी त्यांच्या शैक्षणिक सर्वोत्तमता व प्रभावी संशोधन प्रोग्राम्ससाठी भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. विनासायास प्रक्रिया आणि जलद टर्नअराऊंड वेळ भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्यास मदत करतात.
याप्रसंगी मत व्यक्त करत ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल एज्युकेश्न ग्रुपचे दक्षिण आशियामधील प्रादेशिक संचालक अमित उपाध्याय म्हणाले, ”आम्हाला आमच्या सहयोगी नेटवर्कमध्ये ३०हून अधिक युनिव्हर्सिटीजना ऑनबोर्ड करण्याचा आनंद होत आहे. आम्ही जागतिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व युनिव्हर्सिटींना सक्षम करण्याप्रती समर्पित आहोत आणि सर्वोत्तमतेप्रती आमची कटिबद्धता आमच्या उत्पादनांच्या विकासामधून दिसून येते. आमच्या उत्पादनांना टॉप-रँकिंग युनिव्हर्सिटीजकडून मान्यता मिळाली आहे, तसेच ते अचूक व त्वरित निकाल देतात आणि सर्वांसाठी उपलब्ध आहेत. आम्ही जगभरातील विद्यार्थ्यांना विविध पर्याय देण्यासाठी सहयोगी युनिव्हर्सिटीजच्या आमच्या नेटवर्कचा विस्तार करत आहोत.”
यूके, यूएस, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधील १३५ हून अधिक युनिव्हर्सिटीजकडून मान्यताकृत व अवलंब करण्यात आलेली ऑक्सफोर्ड ईएलएलटी पूर्णत: ऑनलाइन ऑक्सफोर्ड ईएलएलटी डिजिटल व टेस्ट सेंटर-आधारित ऑक्सफोर्ड ईएलएलटी ग्लोबलसह डिजिटल विश्वामध्ये लँग्वेज टेस्टिंग आणते. ऑक्सफोर्ड ईएलएलटी उच्च शिक्षण घेण्याकरिता उमेदवारांच्या वाचन, श्रवण, लेखन व संभाषण कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी सुरक्षित सोल्यूशन आहे. विद्यार्थी जगभरातील कोणत्याही ठिकाणावरून चाचणी देऊ शकतात, जेथे आधुनिक एआय सुरक्षितता उपायांच्या मदतीने ह्युमन प्रोक्टोरिंगच्या माध्यमातून स्थिरता व अचूकतेची खात्री मिळते. अचूकता व उपलब्धतेवर लक्ष केंद्रित करत निकाल विद्यार्थ्यांसाठी ४८ तासांमध्ये उपलब्ध होतात.
ऑक्सफोर्ड ईएलएलटी बाबत: ऑक्सफोर्ड ईएलएलटी हे ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल एज्युकेशन ग्रुपची भाग असलेल्या ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल डिजिटल इन्स्टिट्यूटचे प्रमुख डिजिटल इंग्लिश लँग्वेज लेव्हल टेस्टिंग उत्पादन आहे. ऑक्सफोर्ड ईएलएलटी ग्राहक केंद्रित्वाप्रती कटिबद्ध आहे. मानवी परीक्षकांना नाविन्यपूर्ण एआय-पॉवर्ड प्लॅटफॉर्मचे साह्य मिळते, ज्यामुळे वाचन, श्रवण, लेखन व संभाषण कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी सुरक्षित सोल्यूशनची खात्री मिळते.
ऑक्सफोर्ड ईएलएलटी डिजिटल आणि ऑक्सफोर्ड ईएलएलटी ग्लोबलचा समावेश असलेल्या ऑक्सफोर्ड ईएलएलटीने अनेक पुरस्कार जिंकले आहेत, जसे २०२३ पायोनीअर अवॉर्डसमध्ये ‘हायली कमेण्डेड’, ग्लोबल बिझनेस टेक अवॉर्डस् २०२३ मध्ये फायनलिस्ट आणि अगदी नुकतेच एज्युकेशन इन्व्हेस्टर अवॉर्डस् २०२४ येथे एडटेक श्रेणीमध्ये पुरस्कार. जगभरात १८ ईएलएलटी ग्लोबल टेस्ट सेंटर्स, ज्यापैकी १० भारतात आहेत आणि २०२४ मध्ये सहयोगी मान्यतांमध्ये उल्लेखनीय १२६ टक्क्यांच्या वाढीसह टेस्टिंग उत्पादन अधिक प्रबळ होत आहे आणि आता यूके रसेल ग्रुप युनिव्हर्सिटी मान्यतांचा समावेश आहे, जसे युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल, युनिव्हर्सिटी ऑफ एडनबर्ग, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो. ८५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना सेवा दिल्याच्या ट्रॅक रेकॉर्डसह प्लॅटफॉर्मने प्रभावी वाढ केली आहे, तसेच यूके, यूएस व कॅनडामधील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांसोबत सहयोग केला आहे.