शनिवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडलीये. यावेळी चंद्रकांत शाळेतील मित्रांसह खेळत होता. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला असावा असं म्हटलं जातंय.
उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याचा खेळताना अचानक मृत्यू झाला आहे. चंद्रकांत असे या मुलाचे नाव असून तो अवघ्या 8 वर्षांचा होता. या चिमुकल्याचा मृत्यू नेमका कसा झाला ही संपूर्ण घटना समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडलीये. यावेळी चंद्रकांत शाळेतील मित्रांसह खेळत होता. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला असावा असं म्हटलं जातंय. उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादमध्ये ही घटना घडली आहे.
पाहा व्हिडिओ – https://twitter.com/TeluguScribe/status/1766795665521467832?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1766795665521467832%7Ctwgr%5E21f45b10dc2bf403cf9be0ceed23685cfa493bbf%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fsocially%2Findia%2Fnews%2Ffirozabad-school-cctv-footage-2nd-standard-student-dies-due-to-heart-attack-532702.html