NHI NEWS
SANTOSH SAKPAL
मुंबई, : बधिरान्धता किंवा बहिरेपणाशी जोडून आलेले अंधत्व (एकत्रित अंधत्व आणि बहिरेपणा असलेली व्यक्ती) आणि बहुअपंगत्वामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देत असलेल्या मुलांना आणि प्रौढांना सक्षम बनवण्यासाठी सेन्स इंडिया ही राष्ट्रीय स्तरावरील एकमेव संस्था कार्यरत आहे. यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करणे, मार्गदर्शन करणे, तसेच प्रशिक्षण देण्याबरोबरच बधिरान्धता आणि अनेक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा देणे हे सेन्स इंडियाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ही बांधिलकी इतक्यावरच मर्यादित न ठेवता देशव्यापी जागरुकता मोहिम तसेच दिव्यांगांचे हक्क, संधी बधिरंधता आणि सेवांमध्ये प्रवेश सुरक्षित करण्यासाठीच्या प्रयत्नांपर्यंत ती विस्तारते.
बधिरान्धताच्या क्षेत्रात सेन्स इंडियाच्या कार्याची ओळख करून देण्याबरोबरच जागरुकता आणि संसाधने वाढवण्यासाठी सेन्स इंडियातर्फे मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वर्षी या संस्थेने आपले लक्ष बधिरान्धता आणि अनेक अपंगत्व असलेल्या महिला आणि मुलींवर केंद्रित केले आहे. सर्वात उपेक्षित गटांपैकी एक असल्याने, अपंग महिला आणि मुलींना लिंग आणि अपंगत्वामुळे दुहेरी भेदभावाचा सामना करावा लागतो. सेन्स इंडियाच्या या हस्तक्षेपामध्ये लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि मानसिक आरोग्याच्या पैलूंबरोबरच शैक्षणिक मदतीचाही समावेश आहे. ८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने दिव्यांग मुलींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी संपन्न झालेल्या कार्यक्रमाची संध्याकाळ आणखी अर्थपूर्ण बनली.
मुंबईतील बीकेसी येथील सोफिटेल हॉटेल येथे काल संध्याकाळी सेन्स इंडिया ‘सेन्सेस लॉस्ट अँड फाऊंड- इन्स्पायरिंग स्टोरीज’ हे एक खास काॅफी टेबल बुक लाँच केले. ज्यामध्ये गेल्या २६ वर्षांमधील प्रवासाचा वेध घेणाऱ्या बधिरान्धता असलेल्या मुलांच्या आणि प्रौढांच्या लघुकथांचा संग्रह आणि सेन्स इंडियाच्या भूमिकेचा समावेश आहे. या २६ वर्षांच्या कालावधीतील सेन्स इंडियाच्या कार्याचे प्रदर्शन करणाऱ्या आणि यशोगाथा दाखविणाऱ्या ‘वुई टू एग्झिस्ट’ या लघुपटाचा प्रीमियर देखील संध्याकाळी पहायला मिळाली
या कार्यक्रमाद्वारे, सेन्स इंडियाने आपल्या संस्थेची केवळ बधिरान्धताच्या क्षेत्रात काम करणारी राष्ट्रीय स्तरावरील संस्था म्हणूनच नव्हे तर विकासाच्या क्षेत्रात दखल घेण्याजोगे कार्य करून नावारुपाला आलेली संस्था म्हणून स्वत:ला सादर करणार आहे. यावेळी ही संस्था व्यक्तींबरोबरच निर्णय घेणाऱ्यांशी आणि हाय नेटवर्थ व्यक्तींशी संवाद सुरू करणार आहे. भविष्यकाळात यांमधून सेन्स इंडियाचे बधिरान्धता क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे दीर्घकालीन चॅम्पियन निर्माण होऊ शकतील. या प्रयत्नांद्वारे बधिरान्धता असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध होणाऱ्या सहकार्याव्यतिरिक्त संस्थेच्या देशव्यापी कार्यात योगदान देण्यासाठी नवीन समर्थकांना जोडून ठेवण्याची आणि तारण पद्धतीने निधी उभारण्याची कल्पना देखील आहे.
या कार्यक्रमाविषयी बोलताना सेन्स इंडियाचे कार्यकारी संचालक अखिल पॉल म्हणाले की,“सर्वात उपेक्षित गटांपैकी एक असल्याने, अपंग महिला आणि मुलींना लिंग आणि अपंगत्वामुळे दुहेरी भेदभावाचा सामना करावा लागतो. सेन्स इंडियाच्या हस्तक्षेपामध्ये लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि मानसिक आरोग्याच्या पैलूंवर शैक्षणिक आधाराव्यतिरिक्त महत्त्वपूर्ण मदतीचा समावेश आहे. या कार्यक्रमाद्वारे, बधिरान्धताच्या क्षेत्रात सेन्स इंडियाच्या कार्याचा परिचय करून देण्याचे आणि संपूर्ण भारतातील आमच्या कार्याच्या व्याप्ती वाढविणे आणि कार्यक्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक जागरूकता आणि संसाधने निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.”
सेन्स इंडियाकडे कर्णबधिर संप्रेषण, गतिशीलता, सुलभ माहिती, सहाय्यक उपकरणे आणि पुनर्वसन या क्षेत्रांमध्ये विशेष कौशल्य असलेले तज्ज्ञ कार्यरत आहेत. बधिरान्धता आणि बहुअपंगत्व या क्षेत्रातील अद्वितीय तांत्रिक ज्ञानासह, सेन्स इंडिया १९९७ पासून बहुआयामी दृष्टिकोन ठेऊन कार्य करत आली आहे. यामध्ये त्यांच्या भागीदार एनजीओंना तांत्रिक सहाय्य आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना बधिरान्धता आणि बहुअपंगत्व असलेल्या मुलांसह प्रौढांसोबत काम करण्यासाठी थेट प्रशिक्षण देण्याचाही समावेश आहे.