मुंबई : एन एच आय न्यूज
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबईतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने श्री शिवाजी मंदिर चित्रकला स्पर्धा २१ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. सुरु होणार आहे. शालेय इयत्ता ८ वी ते १० वी आणि ज्युनियर-सिनियर कॉ-NHIलेजच्या विध्यार्थी-विध्यार्थिनीमध्ये ही स्पर्धा राजर्षी शाहू सभागृह, श्री शिवाजी मंदिर, तिसरा मजला, दादर-पश्चिम, मुंबई-४०० ०२८ येथे रंगणार आहे.
श्री शिवाजी मंदिर चित्रकला स्पर्धेसाठी ‘शिवकाळातील व्यक्ती किंवा प्रसंग’ असा विषय असल्यामुळे विविध शाळांतील उदयोन्मुख बालचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे संयोजकांनी स्पर्धेत सहभागाची अंतिम मुदत २० जानेवारी सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत दादर-पश्चिम येथील श्री शिवाजी मंदिर कार्यालयात नोंदणीसाठी वाढविलेली आहे. प्रत्येक गटातील पहिल्या २० विजेत्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष सुधीर सावंत, सरचिटणीस चंद्रकांत सावंत, नियामक मंडळाचे भालचंद्र चव्हाण, संतोष शिंदे, कमलाकर बेलोसे, राजेश नरे, डॉ.मिलिंद तोरसकर आणि विश्वस्त मंडळाचे बजरंग चव्हाण, धैर्यशील नलवडे, सुहास घाग, ज्ञानेश महाराव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ********************