पर्यटन मंत्री यांच्या शुभहस्ते, आज दुपारी 12 वा. महा मुंबई एक्स्पोचे उद्घाटन करण्यात येईल
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रॉस मैदान गार्डन येथे मुंबई फेस्टिवलचे उद्घाटन
मुंबईची संस्कृती आणि विविधता जपणारा लोकांचा हक्काचा उत्सव सुरू होत आहे
सांस्कृतिक विविधतेच्या विश्वात मग्न व्हा:
विविधतेने नटलेल्या समाजांना एकत्र आणण्यासाठी आणि या शहराचा अजरामर वारसा पुढे चालवण्यासाठी, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक मुंबई फेस्टिवलचे अनावरण!
मुंबई, 20 जानेवारी, 2024: आज, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे, मुंबईतील बहुप्रतिक्षित सोहळ्यांपैकी एक – मुंबई फेस्टिवल 2024 चे, क्रॉस मैदान येथे एका नेत्रदीपक समारंभात उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन समारंभात एक मंत्रमुग्ध करणाऱ्या अनुभवातून, मुंबईच्या अलौकिक सांस्कृतिक वारस्याचे वर्णन करत अनोख्या सांस्कृतिक कलाकृतीचा पाया रचला आहे.
काळा घोडा कला महोत्सवासह संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई फेस्टिवल 2024 च्या उद्घाटन समारंभाकरिता, अनेक दिग्गजांची उपस्थिती मुंबईच्या सांस्कृतिक वारसाचे प्रतिबिंबच असेल. मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मा. पर्यटन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री श्री गिरीश महाजन, मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री आनंद महिंद्रा याकरिता उपस्थित असतील.
यावेळी मान्यवरांमध्ये डॉ नितीन करीर, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, श्रीमती जयश्री भोज, सचिव पर्यटन, महाराष्ट्र शासन, आणि डॉ. बी.एन. पाटील, संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि शहरातील अनेक उच्चभ्रू आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गज आदी उपस्थित असतील .
श्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र शासन, महोत्सवाबद्दल उत्सुकतेने म्हणाले, “आजपासून सुरू होणारा हा फेस्टिवल म्हणजे कला, संस्कृती, क्रीडा, फॅशन आणि इतरही बऱ्याच अविस्मरणीय अनुभवांचा बटवा आहे. मनमोहक सांस्कृतिक कलाकृतींपासून ते सुरेल संगीत मैफिलींपर्यंत, या 09 दिवसांची रूपरेषा एका अद्वितीय अनुभवाची खात्री देते. मुंबई फेस्टिवलचा आरंभ करत असताना, मी सर्व भारतीयांना आणि मुंबईकरांना या अनोख्या उत्सवात सहभागी होण्याचे आमंत्रण देतो. या उपक्रमांद्वारे मुंबईच्या ऊर्जेमध्ये सामील व्हा आणि आपल्या मायानगरीच्या चैतन्यमय वातावरणात अविस्मरणीय आठवणी तयार करा. आपल्या संस्कृतीच्या अद्भुत आगगाडीतून एक अविश्वसनीय प्रवास सुरू करण्यासाठी मुंबई फेस्टिवल तुमची वाट पाहत आहे.”
क्रॉस मैदान गार्डन्स येथे फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्याचे स्टार कलाकार आहेत सारा अली खान, अनुपम खेर, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, अमेय वाघ आणि मिनी माथूर. तसेच अशोक हांडे यांचे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे नेत्रदीपक सादरीकरण, नृत्यग्रामचे सादरीकरण व प्रसिद्ध कथक आणि लावणी विशेषज्ञ अदिती भागवत आणि धारावी ड्रीम प्रोजेक्टच्या मुलांसह तबला वादक मास्टर अनुराधा पाल यांचे अनोखे सादरीकरण याचाही समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे आयोजित मुंबई फेस्टिवलमध्ये टाटा पॉवर हे त्यांचे ‘मुंबई पार्टनर’ असून स्टेट बँक ऑफ इंडिया, ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, एरिऑन ग्रुप, इज माय ट्रिप, बिस्लेरी आणि ग्रँड हयात हे प्रमुख पार्टनर आहेत. युनायटेड नेशन्स इंडिया आणि प्रोजेक्ट मुंबई हे या फेस्टिवलसाठी सस्टेनेबिलिटी पार्टनर आहेत.लाईव्ह इव्हेंटमध्ये देशात अव्वल असणाऱ्या विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीकडे मुंबई फेस्टिवलच्या प्रथम आवृत्तीच्या व्यवस्थापनेची धुरा सोपवली आहे.
कशाप्रकारे मुंबई फेस्टिवल संस्कृती, सिनेमा, संगीत, मनोरंजन, चित्रपट आणि स्टार्टअप चॅलेंजेस, खेळ आणि खरेदी यांचा एक अनोखा संगम बनला आहे, हे व्यक्त करताना, मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे मा. अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, “आजपासून सुरू होणारा 9 दिवसीय मुंबई फेस्टिवल म्हणजे धमाल, मस्ती आणि आनंदाचा उत्सव असेल. यामध्ये गेटवे ऑफ इंडिया आणि क्रॉस मैदानापासून ते एमएमआरडीए, कांदिवली आणि नवी मुंबईपर्यंत संपूर्ण शहरात ५० हून अधिक कार्यक्रम होणार आहेत. हा फेस्टिवल शहराच्या आसपास होणाऱ्या संगीत मैफिलींद्वारे इतर ठिकाणी असणाऱ्या जनतेपर्यंत पोहोचणार आहे.”
उद्घाटन समारंभाच्या परफॉर्मन्समध्ये प्रतिभावान गायक डॉ. तुषार गुहा यांचे स्वागतगीत, श्रद्धा विद्यालय तर्फे एक उत्साही लेझीम सादरीकरण आणि शर्वरी जेमिनिस यांच्या कथ्थक नृत्याचा समावेश आहे. नरेश कथ्थक समूहाने सादर केलेल्या फेस्टिवल थीम सॉंगने मुंबईच्या चैतन्यपूर्ण ऊर्जेचे प्रतिबिंब साकार केले आणि शहराच्या सांस्कृतिक अलौकिकतेचे सार टिपले. या मनमोहक प्रहसनांदरम्यान, एका अनोख्या क्षणाने महोत्सवाचे डिजिटल चित्र रेखाटले – डिजिटल पद्धतीने संपन्न होणारा प्रतीकात्मक आणि नाविन्यपूर्ण दीपप्रज्वलन सोहळा, विविध सांस्कृतिक अभिव्यक्तींच्या एकतेचे प्रतीक आहे.
इतरांनाही ‘अस्सल मुंबई’चा अनुभव घेता यावा यासाठी, मुंबई फेस्टिवल बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर महा मुंबई एक्स्पोचे आयोजन करत आहे. यामध्ये विशेष खाद्यपदार्थांची मेजवानी – ‘टेस्ट ऑफ मुंबई’, गेम झोन थ्रिल, दुर्मिळ उत्पादने, हस्तकला, फ्ली मार्केटसारख्या अनुभवांचा समावेश आहे. इतकेच नाही तर, यात अनेक बक्षिसे समाविष्ट आहेत जी दररोज दिली जातील, लोकसंगीत आणि लोकप्रिय संगीत, नृत्य, कॉमेडी, मास्टर शेफद्वारे लाइव्ह कुकिंग आणि रिटेल थेरपीसाठी रिटेल संधी, कार्यशाळा आणि मुलांसाठी गेम्स, हे सारे काही असेल.
“मुंबई फेस्टिवल 2024, संस्कृती आणि कलेचा संगम आहे, मायानगरीच्या चैतन्यमध्ये स्वतःला विसरून जाण्याचे आमंत्रण आहे! जिथे विविधतेतही सौंदर्य आहे, तिथे मुंबईच्या समृद्ध वारशाचे सार अनुभवण्यासाठी आमच्यासह सामील व्हा. हा उत्सव मुंबईच्या भव्यतेचे जागतिक दर्पण आणि आपल्या सामूहिक सांस्कृतिक अभिमानाचा पुरावा बनू द्या”, असे मुंबईचा उत्साह साजरा करण्यासाठी प्रत्येकाला आमंत्रित करताना, श्रीमती जयश्री भोज, पर्यटन सचिव, महाराष्ट्र शासन म्हणाल्या.
“मुंबई फेस्टिवल 2024 हा संस्कृती आणि वारसा यांचा उत्तम मिलाफ आहे. विविध कलात्मक अनुभवांद्वारे मुंबईचे सार प्रतिबिंबित करणाऱ्या या विलक्षण प्रवासात आमच्यासह सामील व्हा. आपल्या शहराच्या सांस्कृतिक ऐश्वर्याचा आनंद घेण्यासाठी सर्वांचे स्वागत आहे, हा उत्सव आपल्या एकतेचे प्रतीक होऊ द्या”, असे डॉ. बी.एन. पाटील, संचालक, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन म्हणाले.
‘रिदम ऑफ मुंबई’ या उद्घाटन सोहळ्यात, धारावी ड्रीम प्रोजेक्ट, सुप्रसिद्ध तबला वादक अनुराधा पाल आणि प्रतिभावान नृत्यांगना अदिती भागवत यांच्या बहारदार सादरीकरणातून मुंबईचे सांस्कृतिक वैभव प्रस्तुत करण्यात आले. हे सादरीकरण मुंबईच्या आत्म्याला व्यापून टाकणारे सूर प्रतिध्वनित करते.
या कार्यक्रमाने आपल्या वैविध्यपूर्ण आणि तल्लीन कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या उत्सवाच्या प्रवासात, मुंबई तिच्या समृद्ध वारशाचे प्रदर्शन करून एक जागतिक सांस्कृतिक केंद्र बनण्याच्या दिशेने पाऊल टाकेल आणि जगभरातील लोकांना उत्सवामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करेल.
मुंबई फेस्टिवलबद्दल:
20 ते 28 जानेवारी दरम्यान साजरा होणाऱ्या मुंबई फेस्टिवलच्या प्रथम आयोजनामध्ये, हा 09 दिवसीय भव्य सोहळा, मुंबईच्या विविध लोकप्रिय ठिकाणी एक केंद्रबिंदू म्हणून साजरा होईल. मुंबईची असीमित ऊर्जा आणि विविधतेत नटलेल्या एकतेचे दर्शन घडवून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवात विविध कार्यक्रम, सादरीकरण आणि अनुभव यांचे मिश्रण असेल. मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्षपद भूषवत श्री. आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वामध्ये, सांस्कृतिक वातावरणात मुंबईचा समृद्ध वारसा आणि चैतन्याचे प्रतिबिंब टिपण्याचे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. विविधतेत नटलेल्या सर्व समाजांना एकत्रित गुंफून, सांस्कृतिक एकात्मता निर्माण करण्याची ग्वाही मुंबई महोत्सव देतो.
पर्यटन संचालनालयाबद्दल:
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र पर्यटनाची प्रमुख संस्था, राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध पर्यटन योजना,प्रसिद्धी व प्रचाराचे कार्य करते. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या स्थापनेपासून, राज्याने अनेक टप्पे गाठले आहेत आणि विविध उपक्रमांच्या मदतीने अनेक शिखरे गाठली आहेत.
महा मुंबई एक्स्पो 2024 च्या काही ठळक गोष्टी:
फूड एक्स्ट्राव्हगांझा:
भेलपुरी, पाणीपुरी, गोळा, कुल्फी आणि आइस्क्रीम विकणाऱ्या मुंबई चौपाटीसारख्या स्टॉल्सवर मुंबईच्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा आनंद घ्या. मासळी आणि चिकन-मटण थाळीच्या विविध चवींमध्ये मग्न व्हा आणि सिचुआन स्पाइसच्या अनोख्या मुंबई-शैलीतील इंडो-चायनीज पाककृतीचा आस्वाद घ्या. मुंबई फेस्टिवल 2024 मध्ये जिटीसीद्वारे “टेस्ट ऑफ मुंबई” नावाने प्रचलित 20 पेक्षा जास्त खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर मनोसक्त खा. बडेमिया, सिचुआन स्पाइस बाय व्हाईटलाइट, माराकेश, प्रतापजीज, फ्रेड टी, टिब्स फ्रँकी, द झणझणीत इटरी, जिम्मीस इत्यादींसारख्या मुंबईच्या प्रतिष्ठित स्टॉल्सवरील स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घ्या. नव्या तऱ्हेने सादर होणाऱ्या पारंपारिक महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्या.
गेम झोन थ्रिल्स:
गेम झोनमध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी गेम्स, बंपर कार, एअरलिफ्ट, कोलंबिया बोट्स, प्ले एरिया आणि लाइफ साइज चौपर आणि साप-शिडी यांसारख्या पारंपारिक खेळांच्या धमाल अनुभवांची सज्ज व्हा.
रिटेल थेरपी:
रोमांचक ऑफरसाठी रिटेल झोन एक्सप्लोर करा
‘रॅफ्ल्’ची धमाल :
बॉक्स ऑफिसवर त्यांचे बँड घेताना, त्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याच्या संधीसाठी एक कार्ड मिळेल त्यामध्ये त्यांचे पूर्ण नाव, फोन नंबर आणि ईमेल भरून रॅफ्ल बॉक्समध्ये टाकावे. त्यानंतर बॉक्स ऑफिस जवळील स्टँडींवर बारीक लक्ष ठेवावे.
सूचना आणि बक्षिसे:
फ्रीज, वॉशिंग मशिन, पंखे, ब्लेंडर, मायक्रोवेव्ह यासारख्या बऱ्याच घरगुती इलेक्ट्रॉनिक्सचे विजेते, दिवसाच्या अंतिम सादरीकरणाच्या घोषणेपूर्वी दररोज जाहीर केले जातील. ई-बाईक, हॉलिडे पॅकेजेस, मोबाईल फोन आणि लॅपटॉपसह मेगा बक्षिसे 26 जानेवारीला एक्स्पो आणि 28 जानेवारीला समारोप समारंभात जाहीर केली जातील.
मेजवानीसाठी, खेळांसाठी, खरेदीसाठी आणि मुंबई फेस्टिवल 2024 मध्ये अविश्वसनीय बक्षिसे जिंकण्याच्या संधीसाठी आमच्यासह सामील व्हा!