MUMBAI :-NHI
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबईतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या श्री शिवाजी मंदिर शालेय चित्रकला स्पर्धेत २१ शाळांमधील उदयोन्मुख विध्यार्थी-विध्यार्थिनीनी दर्जेदार चित्रे काढून रंगविली. शिवकाळातील व्यक्ती अथवा प्रसंग विषयावर रेखाटलेल्या चित्रांना कलाप्रेमींनी उत्स्फूर्त दाद दिली. टॉप-२५ नामांकने जाहीर करतांना परीक्षक देखील प्रभावित झाले. मंडळाचे कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण, विश्वस्त ज्ञानेश महाराव, छबिलदास हायस्कूलचे माजी प्राचार्य सतीश इनामदार, ज्येष्ठ कलाशिक्षक रामदास शिर्के, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवरांनी सहभागी स्पर्धकांचे विशेष कौतुक केले.
दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झालेल्या शालेय चित्रकला स्पर्धेत रतुल मांडवकर, रुद्र जासूद, श्री गाडे, श्रुती पाटील, मेहुल ख्रुशवाह, विनायक राकटे, विराज तांबे, ईश्वरी गायकवाड, ओमकार कुंभार, आयुष विश्वकर्मा, ओमकार गाडेकर, साक्षी पटेल, वेदांती सावंत, देवेंद्र शिंदे, अर्शिया अन्सारी, अस्मित सावंत, अनुराधा हळदणकर, रिया परब, खुशबू कुंभार, दिशिता कांबळे, करण इंगवले, भक्ती रासकर, श्रावणी पाटील, योग ठाकूर, कार्तिकी मोहिते आदींचा टॉप-२५ मध्ये समावेश आहे. त्यामधील गुणानुक्रमे पाच विजेत्यांचा गौरव मंडळाचे अध्यक्ष सुधीर सावंत, सरचिटणीस चंद्रकांत सावंत, नियामक मंडळाचे भालचंद्र चव्हाण, संतोष शिंदे, कमलाकर बेलोसे, राजेश नरे, डॉ.मिलिंद तोरसकर आणि विश्वस्त मंडळाचे बजरंग चव्हाण, धैर्यशील नलवडे, सुहास घाग, ज्ञानेश महाराव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २.०० वा. शिवाजी मंदिर येथे होणार आहे.