|
मुंबई,: गेल्या तीन दशकांमध्ये यशस्वीपणे ११ पर्वांचे आयोजन केल्यानंतर ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (AIPMA) पुन्हा एकदा ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३’चे आयोजन केले आहे आणि पाच दिवसांच्या इव्हेण्टदरम्यान अभ्यागतांची उपस्थिती व निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या संदर्भात मागील सर्व विक्रम मोडून काढण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (बीईसी) येथे ७ ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आलेले ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३’ हे भारतातील सर्वात मोठ्या प्लास्टिक्स ट्रेड प्रदर्शनाचे १२वे पर्व आहे, जे उत्पादक, ग्राहक, विक्रेते व अंतिम-वापरकर्त्यांसाठी अपवादात्मक व्यवसाय, नेटवर्किंग व विचारांची देवाणघेवाण करण्याच्या संधी अनलॉक करण्यास सज्ज आहे.
१,२५,००० चौरस मीटर प्रदर्शन क्षेत्रासह ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३’मध्ये प्लास्टिक उत्पादने, प्लास्टिक मटेरिअल्स, मशिन्स, मोल्ड्स व तंत्रज्ञानांच्या व्यापक श्रेणीचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे, जे जागतिक प्लास्टिक्स उद्योगांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहेत. जर्मनी, मलेशिया, दक्षिण कोरिया व चीन अशा देशांव्यतिरिक्त इव्हेण्टमध्ये रिलायन्स, HPCL, IOCL व जेएसडब्ल्यू गुप अशा मोठ्या भारतीय कंपन्यांचा सहभाग देखील दिसण्यात आला. इव्हेण्ट मंत्री नेते, उद्योगातील दिग्गज, उद्योजक, व्यापारी, उद्योग व्यावसायिक आणि प्रमुख आयातदार यांचे केंद्र होते. तसेच हे देशातील सर्वात प्रभावी प्लास्टिक्स प्रदर्शन असल्याचे मानले जात आहे, जे निश्चितच उद्योग वाढीला गती देण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावेल.
उद्घाटनीय समारोहादरम्यान मत व्यक्त करत NEC- प्लास्टिव्हिजन इंडियाचे अध्यक्ष श्री. हरपाल सिंग, ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मनिष देढिया, NAB & GC प्लास्टिव्हिजन इंडियाचे अध्यक्ष श्री. अरविंद मेहता, प्लास्टिव्हिजन इंडियाचे को-चेअरमन डॉ. आशुतोष गोर आणि NEC, प्लास्टिव्हिजन इंडियाचे को-चेअरमन श्री. चंद्रकांत तुरखिया म्हणाले, ”भारतीय प्लास्टिक उद्योगामधील सर्वात मोठी ना-नफा तत्त्वावर आधारित कंपनी AIPMAने १९९२ मध्ये पहिल्या ‘प्लास्टिव्हिजन इंडिया’ची संकल्पना मांडण्यासह आयोजन केले. पहिल्या पर्वामध्ये फक्त ४० प्रदर्शक आणि काही हजार अभ्यागत उपस्थित होते. वर्तमानाकडे लक्ष केंद्रित करत ‘प्लास्टिव्हिजन इंडिया’ सर्वात मोठे प्लास्टिक ट्रेड प्रदर्शन बनले आहे आणि १२वे पर्व पूर्वीपेक्षा अधिक मोठे असेल. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्लास्टिक्स उद्योगाच्या विविध क्षेत्रांमधील भागधारकांना एकत्र आणत ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३’ ‘चक्रिय अर्थव्यवस्था’ थीमवर डिझाइन करण्यात आले आहे आणि अभ्यागतांना शाश्वत पद्धती, मटेरिअल्स व तंत्रज्ञानांची ओळख करून देईल, ज्यामुळे उद्योगाच्या ग्रीन क्रेडेन्शियल्समध्ये वाढ होईल. हे ग्राहक व विक्रेत्यांना एकत्र आणणारे भारतातील सर्वात मोठे प्लास्टिक्स-केंद्रित व्यासपीठ देखील आहे, जेथे अनेक लाइव्ह प्रॉडक्ट लॉन्चेस्, सेमिनार्स, कॉन्फरन्सेस् व समुपदेशन सत्रे प्रदर्शक व अभ्यागतांसाठी महत्त्व वाढवतात. आम्हाला विश्वास आहे की, ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३’ भारतीय कंपन्या व उद्योजकांना नवीन उत्पादने, प्रक्रिया व तंत्रज्ञनांमध्ये नाविन्यता आणण्यास प्रेरित करेल, ज्यामुळे भारत भविष्यात प्लास्टिक्स उत्पादनासाठी जागतिक केंद्र बनू शकेल.”
HPCL- मित्तल एनर्जी लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि AIPMA च्या प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३ च्या १२व्या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमामधील प्रमुख अतिथी श्री. प्रभ दास म्हणाले, ”प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३ भारतातील प्लास्टिक्स उद्योगाच्या विकासामधील मोठा टप्पा आहे. हे प्रदर्शन कंपन्यांना त्यांची नाविन्यता दाखवण्यासाठी आणि नवीन व्यवसाय संधींचा शोध घेण्यासाठी व्यासपीठ म्हणून सेवा देईल. १,५०० हून अधिक प्रदर्शक, नवीन उत्पादन पद्धतींचे प्रदर्शन, रिसायकलिंग पॅव्हिलियन्स, कन्सल्टण्ट क्लिनिक्स, रोजगार व करिअर मेळावे आणि वैद्यकीय पॅव्हिलियन्ससह मी भारतातील प्लास्टिक्स उद्योगाचे परिवर्तन पाहण्यास, तसेच उद्योगाच्या भवितव्याला आकार देण्यामध्ये भूमिका बजावण्यास उत्सुक आहे.”
प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३ च्या १२व्या पर्वाला रसायने व खते मंत्रालय, रसायने व पेट्रोकेमिकल्स विभाग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय यांचा पाठिंबा आहे. तसेच AIPMA ऑनसाइट किंवा ऑनलाइन ब्रॅण्डिंग उपक्रमांच्या माध्यमातून सहभाग घेणाऱ्या एमएसएमईंसाठी अनेक फायदे प्रदान करत आहे. ‘प्लास्टिव्हिजन इंडिया’ हे पॅरिसमधील प्रमुख जागतिक संस्था यूएफआय आणि प्रदर्शन उद्योग प्राधिकरणाकडून मान्यता असलेले प्लास्टिक उद्योगामधील एकमेव व्यापार मेळावा प्रदर्शन आहे, तसेच जागतिक स्तरावरील टॉप ५ उद्योग इव्हेण्ट्समध्ये सामील आहे. AIPMA ला ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३’ गेल्या पर्वातील उपस्थित २,२९,००० अभ्यागतांचा विक्रम मोडून काढण्याची अपेक्षा आहे.