MUMBAI : NHI
कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती चषक विनाशुल्क आंतर शालेय सुपर लीग कॅरमच्या अंतिम टप्प्यात मध्य मुंबई विभागातून वडाळ्याच्या सीताराम प्रकाश हायस्कूलने व पूर्व मुंबई विभागातून मुलांच्या मायकल हायस्कूल-कुर्ला संघांनी मुख्य फेरीत प्रवेश केला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित परेल येथील विभागीय शालेय स्पर्धेमध्ये सीताराम हायस्कूलने ज्ञानेश्वर विद्यालयाचा ३-० असा पराभव करून निर्णायक फेरी जिंकली.
ज्ञानेश्वर विद्यालय विरुध्द सामन्यात सीताराम प्रकाश हायस्कूलच्या वरुण शर्माने निखील शेडगेवर २५-६, आदर्श पालने विशाल सकपाळवर २०-४ असा तर राजवीर पटेलने अजय गायकवाडवर १८-४ असा विजय मिळविला आणि मध्य मुंबई विभागातून सुपर लीगमध्ये प्रवेश केला. पूर्व मुंबई विभागाच्या निर्णायक सामन्यात मुलांच्या मायकल हायस्कूलने मुलींच्या मायकल हायस्कूल संघाला २-१ असे पराभूत केले. पश्चिम मुंबई विभागातून पार्ले टिळक विद्यालय, इझाक न्यूटन ग्लोबल स्कूल-वसई, समता विद्या मंदिर-साकीनाका आदी संघांमध्ये चुरस राहील. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते सहकार्यीत स्पर्धेमधील खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शन देखील लाभणार आहे. पंचाची कामगिरी अविनाश महाडिक, प्रॉमिस सैतवडेकर, सुनील खोपकर, ओमकार चव्हाण, वेदांत महाडिक, श्लोक मोरडे आदी मंडळी करीत आहेत.