सारेगामा प्रस्तुत ‘अंबिके’
देवीचा आणि स्त्रीशक्तीचा जागर करणारा नवरात्रोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गायक अनिरुद्ध जोशी ‘अंबिके’ हे नवंकोरं गाणं खास नवरात्रोत्सवानिमित्त घेऊन आला आहे. प्रसिद्ध म्युझिक कंपनी सारेगामाच्या युट्यूब चॅनेलवर या गाण्याचा आनंद घेता येणार आहे.
सारेगामानं अंबिके या गाण्याची प्रस्तुती केली आहे. रुचा मुळ्ये यांच्या शब्दांना अनिरुद्ध जोशी आणि अक्षय आचार्य यांनी संगीतबद्ध केलं आहे. सारेगमप सारख्या रिअॅलिटी शो मधून पुढे आलेल्या अनिरुद्ध जोशीनं अल्पावधीतच गायक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. विविध गाण्यातून त्यानं त्याच्या गायकीचा अनुभव चाहत्यांना दिला. त्याशिवाय गायक संगीतकार म्हणून अनिरुध्द – अक्षय यांनी म्युझिक अल्बमच्या आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्यानं वेगळ्या आणि उत्तमोत्तम रचना सादर केल्या.
आता नवरात्रोत्सवानिमित्त देवीची स्तुती करणारं अंबिके हे गाणं अनिरुद्धनं सादर केलं आहे. वेगवान आणि जोशपूर्ण असं संगीत असलेलं हे हिंदी गाणं आहे. देवीच्या विविध रुपांचं वर्णन या गाण्यात आहे. त्यामुळे येत्या नवरात्रोत्सवात देवीच्या भक्तांकडून या गाण्याला नक्कीच भरभरून प्रतिसाद मिळणार आहे. अनिरुद्धसारखा नव्या दमाचा आश्वासक कलाकार आणि सारेगामासारखी मातब्बर निर्मिती संस्था या निमित्ताने जोडले गेले आहेत. त्यामुळे येत्या काळात अनिरुद्धकडून आणखी नव्या रचना ऐकायला मिळतील अशी अपेक्षा आहे.
Song Link