संतोष-सोनालीची ‘डेटभेट’..;चित्रपटाच्या नव्या पोस्टरनं वेधलं लक्ष
अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘डेट भेट’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टर चे अनावरण नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आले
सोनाली कुलकर्णी , हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘डेट भेट’ १४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे .
‘डेट भेट’ चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते यांचे आहे . पटकथा व संवाद लेखन अश्विनी शेंडे यांनी केले आहे. प्रदीप खानविलकर हे सिनेमॅटोग्राफर आहेत
‘डेट भेट’ ची निर्मिती शिवांशु पांडे , हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेज पटेल ,प्रशांत शर्मा ,
हनी शर्मा यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते प्रशांत शेळके हे आहेत .
सिनेमाचे संगीत ‘व्हिडिओ पॅलेस’ या म्युझिक लेबल द्वारे प्रदर्शित होत आहे तर चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन फ़िल्मअस्त्रा
स्टुडिओज करत आहेत .