MUMBAI : देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. स्कूटी, बाईक, कार नंतर आता इलेक्ट्रिक थ्री व्हीलरची(रिक्षा) बाजारात आली आहे. कंपन्या इलेक्ट्रिक थ्री व्हीलरकडे वळत आहेत. हे लक्षात घेऊन, Omega Seiki Mobility (OSM) ने आपली शहरी प्रवासी इलेक्ट्रिक थ्री व्हीलर श्रेणी ‘OSM स्ट्रीम सिटी’ भारतात अवघ्या १.८५ लाख रुपयांमध्ये लॉन्च केली आहे.कंपनीने OSM स्ट्रीम सिटीचे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. त्यापैकी एक ओएसएम स्ट्रीम सिटी एटीआर आहे ज्यामध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरी आहे. या वाहनाची किंमत १.८५ लाख रुपये आहे. दुसरे वाहन स्ट्रीम सिटी ८.५ हे फिक्स बॅटरीसह आहे. त्याची किंमत ३.०१ लाख (Ex Showroom) रुपये आहे. OSM स्ट्रीम सिटी ८.५ फिक्स्ड बॅटरी व्हेरियंट शहरी भारतातील सर्व वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. हे वाहन एका चार्जवर ११७ किलोमीटरची रेंज देते आणि पूर्ण चार्जिंग अवघ्या ४ तासात पूर्ण होते.
ही नाविन्यपूर्ण e3EV 8.5 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते जी शहरी वाहतुकीमध्ये कार्यक्षमता आणि सुविधा दोन्ही सुनिश्चित करते. त्याचसोबत आकर्षक आणि आधुनिक दिसते आणि प्रवाशांसाठी ३ जागा आहेत. OSM स्ट्रीम सिटीमधील प्रवास आरामदायी आणि आनंददायक असेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने, याला ड्रम ब्रेक, 4.50 x 10 लो रोलिंग रेझिस्टन्स टायर आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी मिळते. अशा प्रकारे प्रवास करतानाही प्रवासी डिजिटल जीवनाशी जोडलेले राहतील. OSM स्ट्रीम सिटीचा फायदा केवळ प्रवाशांसाठीच नाही तर तो भारतातील ई-रिक्षा चालकांसाठी अतिशय आकर्षक संधी घेऊन आली आहे.
या मॉडेलबाबत ओमेगा सेकी मोबिलिटीचे संस्थापक अध्यक्ष उदय नारंग म्हणाले की, “OSM ने नेहमीच नवोपक्रमाला प्राधान्य दिलेआहे. अशा प्रकारे कंपनीची वाहने नेहमी स्पर्धेच्या एक पाऊल पुढे दिसतात. आम्ही मालवाहू वाहनांसह सुरुवात केली परंतु आता नवीन ऑफरसह आम्ही प्रवासी वाहतूक देखील समाविष्ट करून संपूर्ण 3W धोरणावर काम करतोय. यावर्षी प्रवासी वाहनांवर भर देण्यात आला आहे. OSM उत्पादन पाचपट वाढलं आहे आणि आम्ही येत्या वर्षभरात १०००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक थ्री व्हिलर विकण्याची योजना आखत आहोत.
नवीन OSM स्ट्रीम सिटी एटीआर चालवताना कोणताही आवाज, वायब्रेशन आणि उत्सर्जन होत नाही. सर्व वैशिष्ट्यांसह ही अशा प्रकारची पहिली रिक्षा आहे. यात अत्याधुनिक ली-आयन बॅटरी, मॅन्युअल बूस्ट गिअरबॉक्स आणि अधिक पॉवर, टॉर्क आहे. सन मोबिलिटीच्या सहकार्याने स्वॅप करण्यायोग्य बॅटरी बसवण्यात आली आहे. सन-मोबिलिटीमध्ये द्रुत इंटरचेंज स्टेशन नेटवर्क असेलज्यामुळे OSM ग्राहक काही मिनिटांत बॅटरी बदलू शकतील. बॅटरी चार्ज तपासण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी, स्वॅप स्टेशन शोधण्यासाठी अॅपसह एक इको-सिस्टम असेल असं त्यांनी सांगितले.