नवी दिल्ली : झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज दीपक चहर यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तारांकित फलंदाज केएल राहुल मात्र या मालिकेलाही मुकणार आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात अनुक्रमे १८, २० आणि २२ ऑगस्टला तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. या मालिकेसाठीही भारताच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून शिखर धवन या संघाचे नेतृत्व करेल. महाराष्ट्राचा फलंदाज राहुल त्रिपाठीचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.
संघ : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.