नवी दिल्ली :सेल्फी हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. प्रत्येकाला सेल्फी घेणे आवडते. आज रोजच्या दिनचर्येत आपण सेल्फी सहज काढतो आणि तोय रोजच्या जीवनाचा भाग बनलाय. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की पृथ्वीवर शेवटचा सेल्फी कसा असेल?
पण तुम्हाला आता या प्रश्नाचे उत्तर सहज मिळणार. हो, DALL-E 2 नावाचा एक Artificial intelligence आधारित जनरेटरचा वापर करत तुम्हाला पृथ्वीवरील शेवटचा सेल्फी कसा असेल, याची माहिती मिळू शकते.
या जनरेटरचा वापर करत अनेक लोकांनी पृथ्वीवर घेतलेला शेवटचा सेल्फी कसा असेल हे सांगितले. सध्या या सेल्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय.
Yoo should by now have heard about the artistic AI. DALL•E someone asked it to create “the last selfie on earth” the result is accurate pic.twitter.com/zVnO5QdSIa
— Daniel Silva (@volterinator) July 29, 2022
TikTok वर शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झाले आहेत. यासंदर्भात ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरने म्हटले, आतापर्यंत अनेक आर्टीफिशिअल AI बद्दल ऐकले असेल. मात्र DALL-E 2 नावाचा एक Artificial intelligence आधारित जनरेटरनी पृथ्वीवरील शेवटचा सेल्फी तयार केलाय आणि तो अगदी अचुक आहे.